Ahmednagar News : अहमदनगर शहरातून महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं अशा अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. यात एका बँकेच्या माजी संचालकाने महिलेचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे.
श्रीरामपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात हा प्रकार १२ फ्रेबुवारी रोजी घडला आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुझ्या नवऱ्याने माझ्या बायकोची बदली केली, मी तुला सोडणार नाही, असे म्हणत या एका बँकेचा माजी संचालक असणाऱ्या शिक्षकाने महिलेचा विनयभंग केला. पश्चिम भागातील एका मोठ्या गावातील ही घटना घडली आहे.
जिल्ह्यातील एका बँकेचा माजी संचालक असलेल्या या इसमाने एक शेतकरी महिला शेतामध्ये गुरांसाठी गवत गोळा करीत असताना तिचा विनयभंग केला आहे. तुझ्या नवऱ्याने माझ्या बायकोची तक्रार करून बदली केली, मी तुला तसा सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर अकोलकर तिथून निघून गेला. दि. १२ रोजी सकाळी नऊ वाजल्यानंतर ही घटना घडली आहे. शिक्षक बँकेचा माजी संचालक असणाऱ्या या इसमाकडून असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. या घटनेचा अनेक स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.