जर तुम्हाला सिनेमे बघायला आवडत असतील व टीमची सिनेमांचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. १३ ऑक्टोबर हा पीव्हीआर राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. त्यामुळे फुकरे, राणीगंज, जवान सारखे सिनेमे तुम्ही फक्त ९९ रुपयांत पाहू शकता.
राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून सर्व चित्रपटगृहे ग्राहकांना ९९ रुपयांत सिनेमाची तिकिटे देत आहेत. ही ऑफर देशातील सर्व पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसवर लागू आहे. याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता हे पाहुयात –
तुम्हाला 99 रुपयांत तिकीट का मिळेल ?
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एमएआय) यावर्षी १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याची घोषणा नुकतीच केली होती. यानिमित्ताने देशभरातील चित्रपटगृहांमध्ये केवळ ९९ रुपयांत चित्रपटरसिकांना सिनेमाची तिकिटे मिळणार आहेत.
तर १३ ऑक्टोबरनंतर शनिवार आणि रविवार असल्याने जवळच्या पीव्हीआर किंवा आयनॉक्समध्ये जाऊन चित्रपट पाहू शकता. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोल, मिराज आणि डिलाईटसह देशभरातील चार हजारांहून अधिक स्क्रीन्स राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
अशा प्रकारे बुक करू शकता तिकिटे
१३ ऑक्टोबरपासून देशभरातील ४००० स्क्रीन्सवर हा नियम लागू होणार आहे. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोल, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए २, मूव्हीटाइम, वेव्ह, एमटूके आणि डिलाइट या मल्टिप्लेक्स चेन्स सहभागी होणार आहेत. बुक माय शो, पेटीएम किंवा फोनपेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.