अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- शहरातील वंचित बहुजन युवा आघाडी व अहमदनगर जिल्हा ऊस तोड वाहतुक मुकादम संघटनेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपड्यांची मदत पाठविण्यात आली.
मार्केटयार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मदतीचा टेम्पो कोकणला रवाना करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते सुनिल शिंदे, युवा आघाडीचे जीवन कांबळे, ऊस तोड कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चाबुकस्वार, संतोष धीवर,

विवेक विधाते, प्रदिप केदारे, गणेश पटेकर, रवी भिंगारदिवे, अशोक भोसले, बाळासाहेब भिंगारदिवे, संदीप गजभिव, महावीर मोरे आदी उपस्थित होते. सागर चाबुकस्वार म्हणाले की, पूराच्या प्रलयाने कोकण भागातील नागरिकांचे कुटुंब उध्वस्त झाली आहेत. पूरग्रस्त बांधवांना सावरण्यासाठी मदतीची गरज आहे.
संकटात अडकलेल्या आपल्या पूरग्रस्त बांधवांना धीर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व जिल्ह्यातून मदत पाठविण्यात येत आहे. नुसती साथ नव्हे तर मदतीचा हात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













