यूपीएससी न देता थेट IAS ची पदवी?, बी. अब्दुल नासर यांची प्रेरणादायी कहाणी एकदा नक्की वाचा!

: देशभरातील लाखो तरुणांची आयएएस अधिकारी बनण्याची स्वप्ने असतात. मात्र त्यामागील संघर्ष काहींनाच पार करता येतो. बी. अब्दुल नासर यांची कहाणी त्यापेक्षा वेगळी आहे. कारण त्यांनी ना यूपीएससी परीक्षा दिली, ना कोचिंग घेतलं, पण तरीही ते आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या या प्रवासामागे मोठा संघर्ष देखील आहे.

Published on -

IAS Abdul Nasar | बी. अब्दुल नासर असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी कधी यूपीएससी परीक्षा दिलीच नाही. मात्र तरीही ते आयएएस अधिकारी झाले.  त्यांच्या या प्रवासामागे मोठा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र त्यांची प्रेरणादायी कहाणी प्रत्येकासाठी एक शिकवण ठरेल, हे नक्की. अब्दुल नासर यांचा आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, ते पाहुयात-

कोण आहेत बी. अब्दुल नासर?

बी. अब्दुल नासर यांचा जन्म केरळमधील थलासेरी (Thalassery) येथे एका गरिब कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले. त्यांच्या आईला घरकाम करून पोट भरणे कठीण झाले. त्यामुळे नासर आणि त्यांची भावंडं अनाथाश्रमात राहू लागली. तिथेच त्यांनी तब्बल 13 वर्षे काढली. या काळात त्यांनी शिक्षणासोबतच जीवन जगण्यासाठी अनेक कामं केली.

वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी एका हॉटेलमध्ये क्लीनर म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर वर्तमानपत्र वाटप, ट्यूशन, फोन ऑपरेटर अशी विविध कामं त्यांनी केली. ही सगळी मेहनत त्यांनी केवळ पोटासाठी नव्हे, तर शिक्षणासाठीही केली. त्यांनी थलासेरी येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली आणि 1994 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

UPSC न देता IAS कसे झाले?

त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना 2006 मध्ये मिळालं, जेव्हा त्यांनी केरळ राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे 2015 मध्ये त्यांना सर्वोत्तम उपजिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आलं. हीच कारकीर्द बघून 2017 मध्ये केरळ सरकारने त्यांना थेट आयएएस पदावर बढती दिली, ही गोष्ट विशेष आहे कारण त्यांनी यूपीएससी परीक्षा दिलेली नव्हती.

आज नासर यांनी कोल्लमचे जिल्हाधिकारी आणि गृहनिर्माण आयुक्त अशी उच्च पदं भूषवली आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा संघर्ष, कष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. अनाथाश्रमात वाढलेल्या एका मुलाचं स्वप्न खरं झालं – तेही कोणत्याही शॉर्टकटशिवाय, केवळ प्रामाणिक प्रयत्नांमुळे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News