Maharashtra HSC Result 2025 : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12वी) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बारावीचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत अधिकृतपणे निकालाची घोषणा केली जाईल.
त्यानंतर विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतील. मंगळवार, ६ मे २०२५ पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा हा निकाल असून, लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा क्षण महत्त्वाचा आहे.

निकाल कुठे पाहता येईल?
महाराष्ट्र बोर्डाने निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत:
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org/
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले टाईप करून टाकावं लागेल. निकालाची डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा या संकेतस्थळांवर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करून निकाल तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
निकाल पाहण्याची प्रक्रिया
वरीलपैकी कोणतेही अधिकृत संकेतस्थळ उघडा.
“HSC Result 2025” किंवा “12th Result 2025” लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
“Submit” बटणावर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल; गुणपत्रिका डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
पुनर्मूल्यांकन आणि पुरवणी परीक्षा
निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पुनर्तपासणी किंवा पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास, त्यासाठी काही आठवड्यांत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल. पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत गुणपत्रिका जारी केली जाईल. तसेच, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण होतील किंवा आपले गुण सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल. या पुरवणी परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
निकाल तपासताना रोल नंबर आणि आईचे नाव बरोबर प्रविष्ट केले आहे याची खात्री करा.
संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यावर गर्दीमुळे सर्व्हर डाउन होण्याची शक्यता असते, त्यामुळे धीर धरून पुन्हा प्रयत्न करा.
गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करून सुरक्षित ठेवा, कारण ती पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असेल.
पुनर्मूल्यांकन किंवा पुरवणी परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.