धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत ! मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. लोखंडेंना साथ द्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याकरीता खासदार सदाशिवराव लोखंडे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा संधी द्या,

असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे राहाता येथे बोलत होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेच्या सभापती नीलमताई गोहे, मंत्री दादा भुसे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार वैभव पिचड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिवसेनेचे नितीनराव औताडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, गणपतराव महाले, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. काँग्रेसला हे शक्य झालं नाही. आज भारत बोलतो तर जग ऐकतो, अशी प्रतिमा देशाची जगात निर्माण झाली आहे.

राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या. आमचे सरकार फेस टू फेस असून फेसबुक लाईव्ह सरकार नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली. शिर्डी लोकसभेचे खासदार लोखंडे व दक्षिण नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील या दोघांनाही पुन्हा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पिढ्या न् पिढ्या प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे स्वप्न पूर्ण करायला मोदी व महायुतीचे सरकार सत्तेवर यावे लागले, तेव्हा ही स्वप्नपूर्ती झाली. विरोधकांनी काही केले नाही. नगर- नाशिक व मराठवाडा हा संघर्ष संपुष्टात आणण्याकरिता कोकणात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी आपल्या भागात आणण्यासाठी खा. लोखंडे याना पुन्हा संधी द्यायची आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने निळवंड्याच्या पाण्याचे स्वप्न महायुती सरकारने पूर्ण केले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रति असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe