Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘वंचित’ ठरणार विखे-लंके-लोखंडे यांची डोकेदुखी ! मोठा राजकीय डाव टाकला

Published on -

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बहुजन वंचित आघाडीला घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. परंतु त्याला यश आले नाही. मागील वेळी वंचितने केलेली कामगिरी पाहता त्यांची मते निर्णायक ठणार आहेत. अनेक ठिकाणी वंचितने आपले उमेदवार उभे केले असून काही ठिकाणी अद्याप उमेदवारांची घोषणा बाकी आहे.

अद्यापही महाविकास आघाडी वंचितला सोबत घेण्यास इच्छुक असून त्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यासाठी वंचितने मोठे प्लनिंग सुरु केले आहे. ते मोठा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.

काय आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी प्लॅनिंग
लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ओबीसी तर शिर्डीत आम्ही बौद्ध उमेदवार देणार असल्याचे आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व अॅड. अरुण जाधव यांनी शुक्रवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

चव्हाण म्हणाले लोकसभा निवडणुकीत धर्मांध पक्षाविरोधात संघर्ष करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला मात्र, आघाडीतील काही प्रस्थापितांना आम्ही त्यांच्यासोबत येऊ नये, असे वाटत होते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगरसाठी अरुण जाधव, प्रतीक बारसे, हनुमंत पावणे, संतोष गलांडे, प्रा. महेंद्र शिंदे, राजकुमार आघाव, दिलीप खेडकर, आरती झालदवार, गोरख आळेकर, अनिल पाडळे हे इच्छुक आहेत. शिर्डीसाठी उमेदवारीसाठी २५ जण इच्छुक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विखे-लंके-लोखंडे यांच्यासाठी आव्हान
दक्षण असो वा उत्तर, दोन्ही मतदार संघात वंचितचा मतदार मोठा आहे. सध्या या दोन्ही मतदार संघात विखे यांनी मोठी ताकद लावली आहे. दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे त्यांनी म्हटले आहे.

तर महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनीही जोरदार ताकद लावली आहे. परंतु आता यात वंचित आघाडी आता नेमकी कुणाची मते घेईल व याचा फटका कुणाला बसेल हे अद्याप सांगता येत नसले तरी सर्वांसाठीच वंचितचे हे मोठे आव्हान असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News