अहमदनगर लोकसभेसाठी भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांना यावेळी पुन्हा एकदा खा. सुजय विखे यांनाही उमेदवारी दिली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाने चांगलीच उचल खाल्ली आहे.
कांद्याचे भावते गडगडल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कांदा प्रश्न, कांद्याचे भाव हा शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो कारण त्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याला भाव असणारे महत्वाचे असते.

कांद्याच्या भावाचा प्रश्न केवळ यंदाचं समोर आलाय का? तर मागील अनेक वर्षांत हा प्रश्न सातत्याने उद्भवतच असतो. परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने खा. सुजय विखे यांनी लोकसभेच्या माध्यमातून अनेकदा हा प्रश्न शासन दरबारी मांडला आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे कांद्याबाबत, कांद्याच्या भावाबाबत जे काही केले आहे ते डोळेझाक करून चालणार नाही.
२६ जून २०१९ : २६ जून २०१९ मध्ये खा. सुजय विखे यांनी कांदा प्रश्नाबाबत आवाज उठवलाय होता. यावेळी त्यांनी कांदा सबसिडीबाबत कशा पद्धतीने नियोजजन करता येईल याबाबत सविस्तर माहिती देखील सादर केली होती.
९ जुलै २०१९ : ९ जुलैला देखील विखे पाटील यांनी कृषी एवं किसान कल्याण मंत्र्यांकडे कांदा भावाबद्दल पाठपुरावा केला होता. यात देखील त्यांनी कांदा प्रश्न व शेतकऱ्यांची स्थिती याबाबत पाठपुरावा केलेला दिसून येतो.
२ मार्च २०२० : २ मार्च २०२० मध्ये देखील कांदा निर्यात प्रश्नाबाबत शासन व खा. सुजय विखे पाटील यांच्यात संवाद झाला होता. यावेळी निर्यातबंदीबाबत, कांदा एक्सपोर्टबाबत बोलणे झाले होते.
२०२४ मध्ये अमित शहांशी भेट : कांदा निर्यात बंदीचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर आलेला होता त्यावेळी त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा काही दिवसातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनी एकत्रित कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत अमित शहा यांची भेट घेतली होती.