यंदाच्या लोकसभेत प्रमुख पक्षांकडून मुस्लिम बांधवांना डावलले ! एकही मुस्लीम उमेदवार नाही, पहा चित्र..

Ahmednagarlive24 office
Published:
politics

सध्या निवडणुकांचा थरारक सामना रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळत आहे. इतर पक्षही मैदानात उतरलेले आहेत.

दरम्यान मध्यंतरी एक मुद्दा समोर आला होता तो म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही मुख्य आघाड्यांनी एकाही मुस्लिमाला न दिलेली उमेदवारी. मुस्लीम उमेदवार न दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर या गोष्टीने जास्त हवा खाल्ली.

महाराष्ट्रामध्ये साधारण मुस्लीम धर्मीयांची ११.५४ टक्के लोकसंख्या आहे. असे असूनही वरील दोन्ही मुख्य आघाड्यांनी एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नसल्याचे चित्र आहे. सध्याच्या मितीला महाविकास आघाडीने मुस्लीम मतांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत असले तरी आघाडीनेही एकही उमेदवार या समाजाचा उभा केलेला दिसून येत नाही.

इतर पक्षांचा विचार जर आपण केला तर यात वंचित बहुजन आघाडी, बसप आणि एमआयएम या पक्षांनी जवळपास १० मुस्लिमांना उमेदवारी दिल्याचे दिसते. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत ८१ मुस्लीम उमेदवार निवडणुकीस उभे असून

आजपर्यंत सर्वपक्षीय ५६७ खासदार संसदेत पोहोचले असून त्यात १६ मुस्लीम उमेदवार होते. त्या सोळा मधील १५ काँग्रेसचे होते व एक २०१९ मध्ये एमआयएमचे औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले आहेत त्यांचा यात समावेश आहे.

१४ मतदारसंघांत मुस्लीम मतदारांचे प्रमाण अधिक
महाराष्ट्राचा विचहर जर केला तर ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी धुळे, नांदेड, औरंगाबाद, परभणी, लातूर, भिवंडी, अकोला, ठाणे व मुंबईतील सहा मतदारसंघ अशा तब्बल १४ मतदारसंघांत मुस्लीम मतदारांचे प्रमाण इतर तुलनेत अधिक दिसते.

येथे जवळपास १५ ते २५ टक्केच्या दरम्यान मुस्लिम मतदार आहे. बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर येथे जवळपास १९ मुस्लीम उमेदवार उभे असल्याचे चित्र आहे.

बसप, वंचितकडून चार उमेदवार उभे
मुस्लीम उमेदवारांमध्ये बसपचे ४, वंचितचे ४ आणि एमआयएमचे दोन अशा दहा उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित ७१ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे किंवा अपक्ष असून शिवसेना-भाजपने आजपर्यंत राज्यात मुस्लीम उमेदवार दिलेला नसल्याचे सर्वश्रुत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीतील पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या दोनही पक्षांनी यंदा मात्र मुस्लीम उमेदवार दिलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe