सध्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील हे सांगणे कठीण झाले आहे. तसे जर पाहिले तर राजकारणात सर्वच डावपेच मान्य करून चालावे लागतात. याचे काही उदाहरणे आपल्या सर्वांसमोर आहेत. दरम्यान राजकारणात आपली डावपेच सध्या करण्यासाठी भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करते असे म्हटले जाते.
दरम्यान आता महाराष्ट्राच्या राजकारणात आज आणखी एक घडामोड घडली व हे वक्तव्य खरे आहे की निव्वळ योगायोग अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याचे झालेय असे की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांच्या कारखान्यावरील जप्तीची कारवाई शिखर बँकेने मागे घेतलीये.
विशेष म्हणजे अगदी थोड्याच वेळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लावलेले सिल देखील काढले जाणार आहे. दरम्यान या घडामोडींच्या दोन दिवस आधी अभिजित पाटील आणि फडणवीस यांच्या भेटी झाल्या.
त्यानंतर अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देखील दिला. आणि या घडामोडी घडल्यानंतर आज कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरउपयोग की निव्वळ योगायोग अशी चर्चा सध्या सुरु आहे.
पाच मे ला फडणवीसांच्या उपस्थितीत अभिजित पाटील घेणार मेळावा
शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. त्यानंतर पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली मदतीची याचना केली.
फडणवीस यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली. परिणाम असा झाला की, दोन दिवसापूर्वी अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला. आता 5 मे ला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता अभिजित पाटील मेळावा देखील घेणार आहेत.
अचानक मारली पलटी
नुकत्याच काही दिवसापूर्वीच अभिजीत पाटील हे सोलापूर मध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मते मागत होते. कारखान्यावर जप्तीची नोटीस आली व फडणवीसांनी मदतीची ग्वाही दिली अन भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांसुर आता अभिजीत पाटील यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊन टाकला आहे.