Exit Poll : राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तनपुरे सरकार ! विकास कामांच्या जोरावर विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे विजयी होतील

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Tejas B Shelar
Published:
Rahuri Politics News

Rahuri Politics News : २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक साठीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. मतदानानंतर आता साऱ्यांचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. येत्या 23 तारखेला म्हणजेच उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाची साऱ्यांना उत्सुकता आहे. यंदा राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

त्यामुळे ही निवडणूक विशेष चुरशीची ठरली असून मतदारांनी आपला जनादेश सुद्धा दिला आहे. आता फक्त मतमोजणीची प्रतीक्षा आहे. या मतमोजणी मध्ये नेमकी कोणाची सरशी होते? कोणते उमेदवार निवडून येतात? हे सर्व काही 23 तारखेला क्लिअर होणार आहे.

मात्र त्याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल मध्ये महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे याबाबत वेगवेगळे अंदाज समोर येत आहेत.

काही एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला बहुमत दाखवले जात आहेत तर काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत दाखवले जात आहे. म्हणून यंदा कोण 145 आमदारांचे संख्याबळ अर्थातच बहुमताचा आकडा गाठणार? हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे राहणार आहे.

दरम्यान, सकाळच्या एक्झिट पोल मध्ये मतदारसंघांनुसार कोण विजयी ठरणार याबाबत अंदाज वर्तवला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये कोण विजयी ठरणार याबाबतही एक्झिट पोल मध्ये अंदाज बांधला जात आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातला सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे राहुरी.

राहुरीत यंदा कोण बाजी मारणार याबाबतही एक्झिट पोल मध्ये अंदाज देण्यात आला आहे. या मतदार संघात यंदाची लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे अन महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांच्यात झाली.

या सरळ लढतीत दोन्ही गटांकडून अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून जोरदार वातावरण निर्मिती झाली. प्रचारात विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अगदीच सुरवातीपासून आघाडी घेतली होती.

त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे सुप्रीमो शरद पवार यांनीही येथे सभा घेतली होती. दरम्यान, तनपुरे हे आधीपासूनच विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसले. महत्त्वाचे म्हणजे सकाळच्या एक्झिट पोल मध्ये विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे पुन्हा एकदा विजयी होतील असे सांगितले गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe