आली रे आली एक्झिट पोलची आकडेवारी आली! वाचा राज्यात सत्तेत महायुती येणार की महाविकास आघाडी? वाचा एका क्लिकवर

विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती 23 नोव्हेंबर 2024 या दिवसाची. कारण या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे व त्या दिवशी राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार की महायुती याबद्दलचे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे.

Ajay Patil
Published:
exit poll 2024

Vidhan Sabha Election Exit Poll 2024:- विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती 23 नोव्हेंबर 2024 या दिवसाची. कारण या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे व त्या दिवशी राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार की महायुती याबद्दलचे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे या निकालाची उत्सुकता ही सगळ्यांना लागून राहिलेली आहे. आपण बघितले की राज्यातील संपूर्ण वातावरण गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः राजकीय प्रचार तसेच विविध दिग्गज नेत्यांच्या सभांनी ढवळून निघाले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि अपक्ष व इतर बंडखोर उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रचार केला.

ही सगळी धामधूम आज मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन संपली आणि आता प्रतीक्षा आहे ती 23 नोव्हेंबरची आणि त्या दिवशीच राज्यात कोणाची सत्ता येईल हे नक्की होणार. परंतु आता दिवसभरात आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातील काही महत्त्वाच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे.

यामध्ये आता राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले असून यामध्ये विविध संस्थांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर सर्वे करून एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली आहे.

विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कोणाचे येणार सरकार?

1- मॅट्रिझचा एक्झिट पोल- जर आपण मॅट्रिझचा एक्झिट पोल पाहिला तर त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व महायुतीला 150 ते 170 जागांवर यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2- चाणक्यचा एक्झिट पोल- तसेच चाणक्यचा एक्झिट पोल बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये महायुतीला 152 ते 160 जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडी 130 ते 138 जागांपर्यंत पोहोचेल.

म्हणजेच चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार जरी बघितले तरी राज्यांमध्ये महायुतीलाच बहुमत मिळताना दिसून येत असून महायुती सत्तेत येईल असा अंदाज चाणक्याच्या पोलनुसार आपल्याला दिसून येते.

3- पोल ऑफ पोलचा एक्झिट पोल- जसे आपण इतर संस्थांचे एक्झिट पोल पाहिले त्यासारखाच पोल ऑफ पोलचा अंदाज आला असून त्यांच्या पोलनुसार देखील राज्यामध्ये महायुतीला 152 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवली असून राज्यात महायुतीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडीला 126 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज पोल ऑफ पोलने वर्तवला आहे.तर इतरांना दहा जागांवर यश मिळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

4- पोल डायरीचा एक्झिट पोल- पोल डायरीच्या राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीला 122 ते 186 जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागांवर समाधान मानावे लागेल व अपक्षांना मात्र 12 ते 29 जागावर यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

पोल डायरीचा जर पक्षनिहाय अंदाज पाहिला तर त्याच्यामते भाजपला 77 ते 108 अशा सर्वाधिक जागांवर यश मिळेल तर त्या खालोखाल शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळेल व अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर काँग्रेसला 28 ते 47, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 आणि ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

5- पी-मार्कचा एक्झिट पोल- पी मार्कचा एक्झिट पोल जर बघितला तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज असून महायुतीला 137 ते 157 जागांवर यश मिळेल.

म्हणजेच पी मार्कच्या एक्झिट पोल नुसार बघितले तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काटे की टक्कर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच इतरांना दोन ते आठ जागांवर यश मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे.

या सगळ्या संस्थांच्या एक्झिट पोल जर आपण बघितले तर यानुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित होताना दिसत आहे. परंतु एक्झिट पोलपेक्षा 23 नोव्हेंबर रोजी जो काही निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्या दिवशी सगळे चित्र हे स्पष्ट होणारच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe