सध्या देशांमध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला अजून सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू आहे. भारतामध्ये सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार असून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षाकडून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराची तयारी सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झळायला लागले आहेत.
लोकसभा निवडणूक हा एक देशाचा उत्सव असून यामध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे खूप गरजेचे आहे. पण तुम्हाला जर मतदान करायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला मतदान कार्ड म्हणजेच निवडणूक ओळखपत्र असणे खूप गरजेचे आहे.
परंतु बऱ्याचदा काही व्यक्तींकडे मतदार कार्ड नसते किंवा काहींचे हरवलेले असते. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जर मतदार कार्ड नसेल तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार ओळख पटवण्यासाठी इतर 12 कागदपत्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त असे अनेक मतदार आहेत की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त ठिकाणाची
मतदान ओळखपत्र म्हणजेच निवडणूक ओळखपत्र आहेत. बऱ्याचदा अशी एकापेक्षा जास्त ओळखपत्र असलेले मतदाता सापडतात व तरीदेखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. जर अशाप्रकारे जर एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असले तर तो गुन्हा आहे व याकरिता तुम्हाला एक वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.
एका पेक्षा जास्त मतदान कार्ड असतील तर होऊ शकतो तुरुंगवास
बऱ्याच व्यक्तींकडे एकापेक्षा जास्त ठिकाणांचे निवडणूक ओळखपत्र असतात. परंतु हे कायदेशीर दृष्ट्या गुन्हा असून त्याकरिता एक वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर अशी जुने, निवडणूक ओळखपत्र असेल तर ते तुम्ही सरेंडर करणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीचे निवडणूक ओळखपत्र सरेंडर करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून ते तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून सरेंडर करू शकतात. तुम्हाला जर ऑफलाईन सरेंडर करायचे असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या निवडणूक विभागात अर्ज करून नको असलेले वोटिंग कार्ड रद्द करू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने असे करा रद्द
त्याकरता तुम्हाला निवडणूक आयोगाच्या म्हणजेच ईसीआयच्या वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करून तुम्ही नको असलेले वोटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता
व याकरिता तुम्हाला सात नंबरचा फॉर्म भरणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही हा फॉर्म भराल तेव्हा काही कालावधीनंतर तुम्ही तुमचे मतदान कार्ड रद्द झाले आहे का हे तपासण्यासाठी त्याची स्टेटस देखील ट्रॅक करू शकतात.