मतदान झालं, बारामती कोण मारणार? इंदापूरात वनसाईड, भोरमध्ये काकांचा, खडकवासल्यात पुतण्याचा डाव फिरला ! साहेबांसह दादांची धकधक वाढवणारा ग्राउंड रिपोर्ट

Ahmednagarlive24 office
Published:
baramati politics

लोकसभा निवडणुकीचा आणखी एक टप्पा सात तारखेला अर्थात काल पार पडला. यामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीचीही निवडणूक काल झाली. या मतदार संघात ५६.९७ टक्के मतदान झाले आहे.

निवडणुकीच्या आधी अनेक अंदाज, आखाडे जनता बांधत होती. परंतु कालच्या मतदान प्रक्रियेनंतर काही गणिते चुकली, अंदाज चुकले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची दोघांचीही धाकधूक वाढली असेल असे लोक म्हणतायत.

कुठे काय बदललं ?
– बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे खडकवासल्यात असून येथे भाजपचे आजपर्यंत वर्चस्व राहिले आहे. २०१९ मधेही येथे भाजप उमेदवार कुल यांना ७० हजारांहून अधिक मतांची आघाडी दिली होती.

पण सुळेंनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी मागे पाडली. त्यामुळे अजित पवारांची भिस्त भाजपच्या या मतदार संघावर होती पण खडकवासल्यात कमी मतदान म्हणजे साधारण ५० टक्केच्या आसपास मतदान झालेय. त्यामुळे दादांची चिंता वाढलीये.

– बारामतीत मात्र ६४ टक्के म्हणजे चान्गले मतदान झाले. त्यामुळे हे मात्र सुनेत्रा पवारांच्या पथ्थ्यावर पडेल असे दिसते. सुप्रिया सुळेंना बारामतीत ५०-५० वर रोखलं व भोर, इंदापूर, पुरंदर, दौंडमध्ये सुळेंनी १० ते १२ हजार मतांचं लीड मिळवल तरी खडकवासल्यातील

भाजपच्या मतदारांच्या आधारे ते लीड कापता येईल असे अजित पवार समर्थकांना वाटत होते. पण खडकवासल्यात कमी मतदान झाल्याने आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– दरम्यान आता खडकवासल्याची उणीव इंदापूरमध्ये भरली जाईल असे लोक म्हतायेत याचे कारण म्हणजे तेथे बारामीतच्या खालोखाल म्हणजेच ६२.५० टक्के मतदान झालेलं असून याठिकाणी अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार दत्ता भरणे यांनी प्रामाणिक काम केलेले दिसतेय.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही सुनेत्रा पवारांसाठी चांगले काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे जर लीड भेटले तर खडकवासल्याची कसर भरून निघेल असे अंदाज बांधले जात आहेत.

– दरम्यान सुप्रिया सुळे यांना भोर मध्ये अपेक्षा होती, येथे काँग्रेसचे आमदार असल्याने व वातावरण चांगले असल्याने ७०-३० असा सामना होईल असे सुळे समर्थकांना वाटत होते. पण येथे मतदान ५०-५० राहिल्याचे येथील लोक बोलतायत. तसेच दौंडमधलं मतदान ५०-५० टक्के असू शकेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय.

काकांसह पुतण्याचीही वाढली धकधक
एकंदरीतच काय तर खडकवासल्यात दादांचा अंदाज चुकला तर भोरमध्ये ताईंचा. एकंदरीतच यावेळची राजकीय समीकरणे थोडीशी वेगळी फिरल्याने काकांसह पुतण्याचीही धकधक वाढली असावी असे लोक म्हणत आहेत. आता येत्या ४ तारखेलाच नक्की काय होणार हे समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe