नववर्षात आतापर्यंत ११ वाघांचा मृत्यू ; ५ वाघांचा नैसर्गिक, तर ३ वाघांचा अपघाती मृत्यू ! ३ वाघांच्या शिकारीची चौकशी सुरू असल्याची वन विभागाची माहिती

Sushant Kulkarni
Published:

२४ जानेवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात १ जानेवारी २०२५ पासून ५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून ३ वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात २ जानेवारी २०२५ रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला.

तुमसर वनपरिक्षेत्रात ६ जानेवारी रोजी एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला.या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.वणी येथे ७ जानेवारी रोजी एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात ८ जानेवारी रोजी एका बछड्याचा विजेचा धक्का देऊन मृत्यू झाला आहे.

ताडोबा वनक्षेत्रात ९ जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.दासगाव वनपरिक्षेत्रात १४ जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात १५ जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात १९ जानेवारी २०२५ रोजी रेल्वेला धडकून अपघात झाला आहे.शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा २० जानेवारी रोजी नैसर्गिक मृत्यू झाला,तर २१ जानेवारी रोजी नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला.तसेच समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात २२ जानेवारी २०२५ रोजी मृत्यू झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe