पुणे शहरात सोमवारी सकाळी एक अतिशय दुःखद घटना घडली. भरत गायकवाड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला उच्चपदावर बढती मिळाली. पण आनंदी होण्याऐवजी त्याने स्वतःच्या कुटुंबालाच संपविले. त्याने पत्नी आणि कुटुंबातील आणखी एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याने स्वतःचा जीव घेतला. या भीषण घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस अधिकारी असलेल्या भरत गायकवाड यांना बढती मिळाली होती. ते अमरावती मध्ये कामाला होते, पण त्याचे कुटुंब पुण्यात राहत होते. कामातून सुट्टी घेण्यासाठी पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे त्यांनी त्यांच्या पत्नी मोनीवर गोळ्या झाडल्या. तसेच पुतण्या दीपक याने बंदुकीचा मोठा आवाज ऐकून काय झाले हे पाहण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यानंतर दीपकलाही गोळी लागली. त्यानंतर भरतने स्वतःवर गोळी झाडून स्वतःचा जीव घेतला.
अमरावतीचे एसीपी भरत गायकवाड यांनी रात्री उशिरा पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. भरत गायकवाड यांची पत्नी आणि दोन मुले पुण्यात राहत होती. शनिवारी ते अमरावतीहून पुण्यात आले. रात्री उशिरा साडेतीनच्या सुमारास गायकवाड याने पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडून आत्महत्या केली.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
पत्नी मोनीवर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली
भरत गायकवाड हे अमरावती शहरातील राजापेठ विभागाचे एसीपी होते. त्यांचे वय 57 वर्षे होते. नुकतेच ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बढती होऊन एसीपी झाले. ते अमरावती येथे तैनात होते. पहाटे ३.४५ वाजता त्याने पत्नी मोनी गायकवाड हिच्यावर आपल्याजवळ असलेल्या रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या. आवाज ऐकून ३५ वर्षीय पुतण्या दीपक गायकवाड हा वरच्या मजल्यावरच्या खोलीत पोहोचला. दीपकला पाहताच त्याने त्याच्यावरही गोळी झाडली. मात्र, सासू व मुलगा सुहास गायकवाड यांना दरवाजातून ढकलून दरवाजा बंद केला. त्यानंतर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याचाही मृत्यू झाला.
डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले
ही घटना बाणेर, 5 राजगृह बंगला डी मार्टच्या मागे, लक्ष्मण नगर लेन, पुणे येथे पहाटे 4.45 वाजता घडली. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेत परवानाधारक रिव्हॉल्व्हर वापरण्यात आले की खाजगी याचा तपास सुरू आहे.