अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली.

पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट !

सुप्रिया सुळे या सोमवारी (९ ऑक्टोबर) नगर मध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत आ. तनपुरे देखील होते. सुप्रिया सुळे पाथर्डीच्या दिशेने जाताना तनपुरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (अर्थात ट्विटर) वर एक पाेस्ट शेअर केली.

यात त्यांनी अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ अस लिहिल. प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा सुप्रिया सुळे दाैऱ्यावर असताना चर्चेत आणला व यावरूनच सगळी चर्चा सुरु झाली.

काय होती ही पोस्ट ?
”अहिल्यानगर’ जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेल्या आदरणीय खासदार सुप्रिया सुळे..,’ असं त्यात होत. अहमदनगर नाव वगळून ‘अहिल्यानगर’ असं त्यात म्हटलं. ही पोस्ट त्यांनी खा. सुळे यांबरोबर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राेहिणी खडसे यांनाही टॅग केलीये.

काय असावे राजकारण?
शरद पवार गटाची धुरा सध्या सुप्रिया सुळे यांवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या आता सक्रिय होत आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी अहिल्यानगर असं लिहून बरच काही सूचित केलं.

एकीकडे धनगर आरक्षण मुद्दा पेटला आहे. त्यामुळे मुद्दाम हे नाव वापरून सहानुभूती मिळवायची असेल का? अशीही चर्चा आहे. त्याचप्रमाणे त्या पाथर्डीकडे निघाल्या होत्या. मधल्या काही गावांत धनगर समाज बांधव संख्या जास्त आहे. त्यामुळे हा अट्टाहास असावा अशीही चर्चा आहे.

तसेच सरकार आता विसरले आहे त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रवादी लावून धरणार असे तर सूचित करायचे नसेल ना ? किंवा शरद पवार गटाची धुरा सुप्रिया सुळेंवर आहे. त्यामुळे एक स्त्री काही कमी नसते ती काहीही मोठे कार्य कसू शकते. हे तर अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेऊन तनपुरे यांना सूचित करायचे नसेल ना ? असे बहुविध ‘राज’ त्या पोस्ट मागील ‘कारणांत’ असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe