Ahmednagar Breaking : इंदोरीकर महाराजांच्या घराजवळ बिबट्या आला आणि शिकारीचा थरार ! पहा CCTV तील धक्कादायक फुटेज…

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Breaking :- बिबट्याची दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती आहे हे वेगळे सांगायला नको. दिवसा देखील शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या घराजवळ बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली.

सीसीटीव्ही मध्ये हा बिबट्या एका कुत्र्याला घेऊन जाताना दिसत आहे. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठच्या वेळी ही घटना घडली.निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज हे महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या गोष्टींवर खास शैलीत भाष्य करणारे कीर्तनकार म्हणून ओळखले जातात.

इंदोरीकर राज्याच्या विविध भागात कीर्तन करत असतात. संगमनेर तालुक्यातील ओझर गावात इंदोरीकर महाराजांचे घर आहे. आता त्यांच्या घराजवळ बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

संगमनेर तालुक्यातील ओझर गावात इंदोरीकर महाराज सध्या वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरासमोर बिबट्या खुलेआम फिरताना दिसत आहे. घराच्या परिसरातील बिबट्याच्या मुक्त संचारची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडीओ देखील सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, बिबट्या घरात आला आणि कुत्र्यावर झेप मारून त्याला उचलले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग व प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ओझर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

 

CCTV तील धक्कादायक फुटेज पहा पुढील लिंकवर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe