Ahmednagar Breaking : माजी महसूल मंत्री आ. थोरातांच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Ahmednagarlive24
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत महतवाची बातमी आली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक व सोबतच पाच ते सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्वी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या सर्वांवर नोंदवला आहे.

या नंतर राजकीय वातावरण तापले असून हिंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी केलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी केलय व इतकेच नव्हे तर काल गाव बंद देखील ठेवले होते.

बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या साहित्याच्या १० संच पेट्या बेकायदेशिररित्या बाळगून शासनाची फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून हा गुन्हा दाखल झाला असल्याचे कळते. परंतु याला आता राजकीय झालर लागल्याने खळबळ उडाली आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांनी बांधकाम कामगारांच्या संच संदर्भात ईमेलवर तक्रार अर्ज प्राप्त झाली असल्याच्या कारणावरून दोघांना सदर ठिकाणी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यांसुर कामगार अधिकारी तुषार बोरसे व दुकान निरीक्षक ललित प्रकाश दाभाडे १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तेथे गेले व पाहणी केली. संगमनेरचे तलाठी देखील पंच म्हणून होते.

निमगावजाळी ते आश्वी बुद्रूक रस्त्यालगत विजय हिंगे यांचेकडे आश्वी बुद्रूक येथे जावून केलेल्या पाहणीत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे संच प्रत्येकी किंमत ८ हजार ५०० असे एकूण १० संच ते थे आढळून आल्याचे समजले.

हे १० संच हे विजय हिंगे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीलगत ऊसाच्या शेतात होते असे समजले, बनावट कागदपत्रे बनवून या पेट्या मिळवल्या व त्या कामगारांना वाटप न करता स्वतःजवळ ठवून शासनाची फसवणूक केली असा आरोप केला जात आहे.

राजकीय झालर
परंतु आता या प्रकारानंतर राजकीय धुळवड उडाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधकांनी षडयंत्र रचत हे कृत्य केल्याचे म्हटलं जात आहे. यामुळे गावकऱ्यांनी गाव बंद देखील ठेवले.

शिवाय या मागील सुत्रधार १५ दिवसात न शोधल्यास पोलिस स्टेशन समोर उपोषणाला बसण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ही घटना झाल्यानंतर विजय हिंगे म्हणाले आहेत की, मी प्रामाणिक काम करत असून गोरगरिबांचा पैसा खाऊन मोठा होणार नाही. लोकांचा विश्वास असल्याने माझ्या हातात ग्रामपंचायत गावकऱ्यांनी दिली. प्रामाणिक कामाला छेद लावण्याकरिता हे सगळे प्रयोग सुरु असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe