Ahmednagar Breaking : दारूसाठी खिशातून पैसे चोरले, डोक्यात दगड टाकून खून केला, डोंगरात जाऊन लपून बसले, नंतर…

Ahmednagarlive24
Published:

दारूसाठी मंदिर परिसरात झोपलेल्या वृद्धाच्या खिशातून पैसे काढले नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून मारले दोघेही डोंगरात जाऊन लपले स्थानिक गुन्हे शाखेला तपास लागताच २४ तासात जेरबंद केले,हा थरार घडला आहे अहमदनगर जिल्ह्यात.

संगमनेर तालुयातील साकुर येथे देवराम मुक्ता खेमनर यांचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. त्यांचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांनी फिर्याद दिली होती. घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात दोन आरोपी जेरबंद केले आहेत.

नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा.चिंचेवाडी, साकुर, ता.संगमनेर), सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा.कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकुर, ता.संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक आहेर यांनी १९ जानेवारीस स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ अतुल लोटके, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल आदींचे पथक तयार केले.

पथकाने घटनास्थळी जात आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरु केला. यादरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपी नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे दोन्ही चिंचेवाडी डोंगरामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली.

पथकाने चिंचेवाडी परिसरातील डोंगरात जात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. दारु पिण्यासाठी देवराम खेमनर यांच्या खिशातील पैसे काढून त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे संगितले. यातील आरोपी नामदेव रंगनाथ सोन्नर हा इतर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचेच समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe