Ahmednagar Politics : तीन राज्यांतील यशानंतर ‘अहमदनगर’साठी भाजपचे ‘हे’ खास प्लॅनिंग ! 5 जागेंसाठी विशेष रणनीती

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये छत्तीसगढ, राजस्था, मध्यप्रदेश या तीनही राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा पॉजिटीव्ह मोड मध्ये आले आहे.

आगामी लोकसभेची विजयी घौडदौड करण्यास पुन्हा सज्ज झाले आहे. परंतु या निकालांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. अहमदनगरमध्ये देखील याचे पडसात पाहायला मिळतील. काही राजकीय गणित बदलताना दिसतील.

अहमदनगरवर विशेष लक्ष केंदित, ‘हे’ खास प्लॅनिंग

अहमदनगर जिल्हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसते. परंतु आता भाजपने यासाठी खास प्लॅन तयार केला आहे.

जिल्ह्यात २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली व कर्जत-जामखेड, अकोले, कोपरगाव, नेवासे, श्रीगोंदे या पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले.

आता ज्या पाच जागा भाजपने गमावल्या होत्या त्या पुन्हा घेण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खासदार, आमदार, भाजप पदाधिकारी यांचा समावेश असलेली शंभर जणांची टीम तयार केली आहे.

रोहित पवारांना खास टक्कर

कर्जत जामखेड मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु याच बालेकिल्ल्यात मागील पंचवार्षिकला राष्ट्रवादी कडून रोहित पवार हे विजयी झाले. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव झाला. आता पुन्हा एकदा कर्जत-जामखेड ताब्यात घेण्यासाठी भाजप सर्वस्वी प्रयत्न करताना दिसेल. आ. रोहित पवारांना खास टक्कर भाजपला द्यावी लागेल.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला कसा शह देणार?

भाजपने जरी यंत्रणा उभी केली असली व विविध जागेंवर लक्ष द्यायला सुरवात केली असली तरी राज्यात शिंदे- फडणवीस-पवार यांचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जागावाटपात अडचणी येतील असे वाटते.

महायुती असल्याने विधानसभा निवडणुकात जागावाटपाचे धोरण कसे ठरणार याबाबत संभ्रम सध्या तरी दिसत आहे. सध्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षालाच उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे.

त्यामुळे जर असे झाले तर अहमदनगरमध्ये अनेक जागा अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे भाजप मागील वेळी गमावलेल्या पाच जागांवर कसे नियोजन करणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe