अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !

Ajay Patil
Published:
Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी झाली होती आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.

यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या राहुरी मंडळ मध्ये देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एकत्रित रित्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करण्यात आले होते.

हे पण वाचा :- खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !

 यानुसार मंडळातील 6253 शेतकऱ्यांना 12 कोटी 95 लाख 35000 ची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. यामध्ये काही शेतकरी गावात नसणे, केवायसी न जुळणे या कारणाने काही प्रस्ताव रद्द करण्यात आले आणि 6 हजार 222 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

यानुसार 3548 शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचा पैसा जमा झाला. या शेतकऱ्यांना सहा कोटी 19 लाख 86 हजार रुपयाची नुकसान भरपाईची रक्कम मिळाली. मात्र तरीही 2 हजार 674 शेतकरी नुकसान भरपाईचा रकमेपासून वंचित राहिलेत. यामुळे या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत होती. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! नांदेडलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा; कोणत्या मार्गावर धावणार? पहा….

मात्र आता राहुरी महसूल प्रशासनाने संबंधित शेतकर्‍यांना आपली केवायवसी तपासणी करीत आधार पडताळणी करून महा ई सेवा केंद्रामार्फत आपल्या नावावरील बँक खाते, आधार कार्ड क्रमांक तसेच शेती गट क्रमांक तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

यामुळे या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. निश्चितच नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे मात्र खरीप हंगामाच्या तोंडावरच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो असं सांगितलं जात आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! यंदा विदर्भात होणार शंभर टक्के पाऊस; तुमच्या जिल्ह्यात कसा राहणार पाऊस? वाचा…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe