Carrear In Isro : इस्रोमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल ? हे आहेत टॉप पाच पर्याय

Ajay Patil
Published:
isro

Carrear In Isro :-  अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु त्या त्या क्षेत्राला अनुरूप असलेले अभ्यासक्रम निवडणे व त्या अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे देखील तितकेच गरजेचे असते. आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे  अनेक प्रकारचे अभ्यासक्रम देखील आता शिकवले जाऊ लागली आहे.

यामध्ये जर आपण अवकाश संशोधन व उपग्रह तंत्रज्ञान या क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये देखील करिअरच्या खूप मोठ्या संधी असून खूप मोठे पॅकेज या ठिकाणी जॉब केल्यानंतर मिळू शकते. या क्षेत्राशी संबंधित असलेली प्रमुख संस्था म्हणजे इस्रो ही होय. अंतराळ संशोधन संस्थांपैकी ही एक जागतिक स्तरावरील प्रमुख संस्था असून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची या संस्थेत करिअर करण्याची इच्छा असते.

परंतु याकरिता तुम्हाला काही अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण असे कोणते अभ्यासक्रम आहेत जे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इसरो या संशोधन संस्थेमध्ये करिअर करता येईल? त्याबद्दल महत्त्वाची माहिती घेऊ.

 इस्रोमध्ये करिअर करायचे तर हे अभ्यासक्रम ठरतील महत्त्वाचे

1- एव्हीयोनिक्स इंजीनियरिंग हा एक अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम असून या क्षेत्रातील इंजिनिअरिंग पूर्ण केलेले विद्यार्थी हे अनेक प्रकारच्या नवनवीन डिझाईन विकसित करणे व त्या डिझाईनची चाचणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकतात. जर आपण इस्रो या संस्थेतील एव्हीयोनिक्स इंजिनीयर यांचे काम पाहिले तर हे प्रामुख्याने विमान आणि अंतराळ यान यांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणारी जी काही इलेक्ट्रॉनिक प्रणाली असते तिचे काम सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी यांच्यावर असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे एव्हीयोनिक्स  प्रणालीला वैमानिक प्रकल्पांमध्ये समाविष्ट करता यावे यासाठी सिस्टम इंजिनिअर सोबत देखील या इंजिनिअर्सना काम करावे लागते. डिझाईन इंजिनिअरिंग तसेच नेव्हिगेशन आणि कंट्रोल प्रणाली तयार करणे आणि ती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी यांच्याकडे असते. तसेच एव्हीओनिक्स इंजिनियर्स सिस्टम सॉफ्टवेअर देखील तयार करतात व त्यांचे देखील काम करतात व इतकेच नाहीतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये देखील हे इंजिनियर्स काम करतात.

2- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग इस्रो मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्स यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे या संस्थेतील विद्युत प्रणाली आणि ऊर्जेचा स्त्रोत विकसित करणे व त्याची चाचणी करून देखरेख करण्याचे महत्त्वपूर्ण काम यांना करावे लागते. एवढेच नाही तर इलेक्ट्रिकल इंजिनियर पावर स्पेस क्राफ्ट आणि उपग्रहाच्या डिझायनिंगच्या कामांमध्ये हे इंजिनियर्स काम करत असतात.

यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट्स तसेच कंट्रोल सिस्टम आणि पावर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कची डिझाईन आणि चाचणी करण्याचे काम देखील यांच्यामार्फत पार पाडले जाते. परंतु इस्रो मध्ये काम करायचे असेल तर त्याकरिता स्पेसशिप इलेक्ट्रिकल इंटिग्रिटी आणि की सिस्टम ऑपरेशन मधील माहिती आणि ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे.

3- सॅटॅलाइट कम्युनिकेशन इंजीनियरिंग यामध्ये सॅटॅलाइट कम्युनिकेशन सिस्टम डिझाईन आणि ऑपरेट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे सॅटॅलाइट कम्युनिकेशन इंजिनियर करतात. तसेच सॅटॅलाइट कम्युनिकेशन इंजिनिअर इस्रोचा डेटा ट्रान्सफर तसेच दूरसंचार आणि प्रसारणासाठी मदत करणाऱ्या सिस्टम वर देखील काम करते. सॅटेलाईट कम्युनिकेशन इंजिनिअर्स हे ग्राउंड स्टेशन ते उपग्रह यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात व डेटा ट्रान्समिशन, स्पीड ऑप्टिमायझेशन आणि सिग्नल क्वालिटी उत्तम ठेवण्याचे काम यांच्या माध्यमातून पार पडते.

4- सिस्टीम इंजीनियरिंग सिस्टम इंजीनियरिंग क्षेत्रातील तज्ञ हे स्पेस मिशन कंपोनंट डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापनाचे काम यांच्यावर असते. विविध उपप्रणालींच्या कामांमधील मार्गदर्शन आणि नेवीगेशन व नियंत्रणाचे काम देखील सिस्टम इंजिनियर्स पार पाडतात.

5-मेकॅनिकल इंजिनिअरिंग इस्रो मधील मेकॅनिकल सिस्टम ची रचना, चाचणी आणि  देखरेख ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी मेकॅनिकल इंजिनिअर्स वर असते. विविध प्रकारच्या अंतराळ मोहिमांमधील थर्मल कंट्रोल आणि स्ट्रक्चरल सिस्टम करिता काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी देखील मेकॅनिकल इंजिनिअर पार पाडतात. एखादे यान तयार करताना त्याच्या रचनेपूर्वीच्या अनेक कामांमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe