Coal Scam : लोकमतचे विजय दर्डा आणि त्यांच्या मुलाला 4 वर्षे तुरुंगवास

Ahmednagarlive24
Published:

Coal Scam :- कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी खासदार आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्लीतल्या सीबीआय विशेष न्यायालयानं सुनावली शिक्षा. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीनं खाणीचं कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे

छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात न्यायालयाने माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणात कंपनी मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही न्यायालयाने 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील आणखी एक दोषी, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सीबीआयने या प्रकरणातील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. केंद्रीय तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले होते की, दोषी आरोग्याचा हवाला देऊन कमी शिक्षेची मागणी करू शकत नाहीत, या प्रकरणात दोषींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत.

सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यानंतर आता आज विजय दर्डांसह इतरांना शिक्षाही सुनावण्यात आली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe