Oppo A78 4G : 50MP चा जबरदस्त कॅमेरा आणि 67W चार्जिंग! लवकरच लाँच होणार ओप्पोचा शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo A78 4G : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनी आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लवकरच Oppo A78 4G हा जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहे. अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत आहे.

Oppo A78 4G या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना जबरदस्त प्रोसेसर मिळेल. त्याशिवाय 50MP कॅमेरा आणि 67W चार्जिंग मिळेल. या स्मार्टफोनची बॅटरी 30 मिनिटांत 75% पर्यंत चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असणार आहे.

त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल. हा फोन बाजारात लाँच झाल्यानंतर तो सॅमसंग, रेडमी यांसारख्या स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देईल.

जाणून घ्या Oppo A78 4G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. स्टोरेजचा विचार केला तर Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असणार आहे.

तसेच 8 GB व्हर्चुअल रॅम देखील आहे. तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या स्मार्टफोनची मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवू शकता. इतकेच नाही तर प्रोसेसर म्हणून कंपनी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 पण देण्यात येत आहे.

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य सेन्सरसह 2-मेगापिक्सेल बोकेह लेन्सचा समावेश केला आहे. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून यात दिलेली बॅटरी 5000mAh ची दिली आहे.

ही बॅटरी 67W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची बॅटरी 30 मिनिटांत 75% पर्यंत चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणारा हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करेल.