DA Hike : महागाई भत्त्यात कधी होणार वाढ? किती प्रमाणात आहे वाढ होण्याची शक्यता? वाचा अपडेट

Ajay Patil
Published:
government employees

DA Hike :- देशातील एक कोटी केंद्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्यामध्ये सरकारकडून वाढ होण्याच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. कारण जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर वर्षातून दोनदा महागाई भत्ता संशोधित केला जातो. परंतु यावर्षीचा महागाई भत्त्यात 24 मार्च 2023 नंतर कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

तसेच 1 जानेवारी 2023 पासून ते लागू देखील करण्यात आलेले होते. त्यामुळे आधी असलेला 38% महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होऊन तो आता 42 टक्के झाला आहे. परंतु त्यानंतर दुसऱ्या वाढीची घोषणा अजून देखील करण्यात आलेली नसल्यामुळे कर्मचारी या घोषणाची वाट पाहत आहेत.

 महागाई भत्त्याच्या बाबतीत हा वर्तवला जातोय अंदाज

सरकारकडून अजून कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे काहीही याबाबत सांगण्यात आलेले नाही. परंतु या बाबतीत अंदाज आहे की पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याचा विचार केला तर या कालावधीमध्ये किरकोळ महागाईचा दर हा 15 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. यामुळे केंद्र सरकारकडून एक कोटी पेक्षा अधिक कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करून तो 45% केला आहे.

परंतु या निर्णयाची घोषणा ही सप्टेंबर 2023 मध्ये केली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महागाईचा भार कमी करण्याकरिता सरकारी कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो. महागाईत वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांना जीवनाचा स्तर राखता यावा यासाठी महागाई भत्त्याचे महत्त्व आहे.

 महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते?

महागाई भत्त्याचे गणना ही देशाच्या सध्याच्या महागाईचा दर काय आहे त्यानुसार दर सहा महिन्यांनी केली जाते. संबंधित वेतनश्रेणीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर त्याची गणना होत असते. याकरिता महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांक वर आधारित किरकोळ महागाई दरावर मोजला जातो. त्याचा भार मात्र सर्वसामान्य ग्राहकाला सहन करावा लागतो. किरकोळ महागाई दराचा थेट परिणाम हा सामान्य लोकांवर होत असल्यामुळे याच आधारावर  महागाई भत्त्याची गणना केली जाते.

 महागाई भत्त्यात वाढ झाली तर पगारात वाढ कशी होते?

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमचे मूळ वेतन दहा हजार रुपये आहे आणि ग्रेड पे 1000 रुपये आहे. एकूण पगार 11 हजार रुपये होतो. जर अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाली व तो 45 टक्के झाला तर तुम्हाला 4950 रुपये महागाई भत्त्याच्या स्वरूपात मिळतील. म्हणजे सर्व मिळून तुमची एकूण सॅलरी 15 हजार 950 रुपये होते.

जर आत्ताच्या महागाई भत्ताचा दर पकडला तर तो बेचाळीस टक्के आहे. त्यानुसार तुम्हाला 15620 रुपये पगार मिळत आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात तीन टक्क्याचे वाढ होऊन तो 45% झाल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 330 रुपयांचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe