ज्येष्ठ लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हरी नरके यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
हरी नरके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. त्यांनी महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा ही पुस्तके लिहिली आहेत.
हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, होते. सोशल मीडियावरही ते सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता.
सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला, अशी प्राथमिक माहिती कळते आहे.
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं.