HDFC Bank Scholarship: एचडीएफसी बँक पहिली ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी ‘या’ विद्यार्थ्यांना करेल आर्थिक मदत, वाचा पात्रता आणि कागदपत्रे

Published on -

HDFC Bank Scholarship:-  बऱ्याचदा समाजामध्ये आपण पाहतो की घरची आर्थिक परिस्थिती किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेक मुलांना अभ्यासात हुशार राहून देखील आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता काहीतरी काम धंदा करावा लागतो. त्यामुळे त्यांचे शिक्षण तर अपूर्ण राहतेस परंतु त्यांचे भविष्यकालीन खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकारकडून देखील विविध प्रकारचे शिष्यवृत्ती दिल्या जातात.

जेणेकरून आर्थिक कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये हा त्यामागचा हेतू असतो. अगदी त्याच पद्धतीने आघाडीच्या असलेल्या एचडीएफसी बँकेने देखील एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील जे काही वंचित घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाकरिता आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

हा बँकेचा एक शिष्यवृत्ती कार्यक्रम असून तो इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी आणि डिप्लोमा, आयटीआय तसेच पॉलिटेक्निक  आणि इतर अभ्यासक्रमांकरीता असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्येमुळे आणि आर्थिक कारणामुळे शिक्षणाचा खर्च उचलणे अशक्य होते व त्यांना शिक्षण सोडावे लागते अशा विद्यार्थ्यांना बँकेच्या या उपक्रमांतर्गत ७५ हजार रुपया पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. एचडीएफसी बँकेच्या या उपक्रमाचे नाव आहे एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम हे होय. या उपक्रमाबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 शालेय विद्यार्थ्यांकरिता एचडीएफसी बँकेची परिवर्तन ईसीएसएस स्कॉलरशिप

) लागणारी पात्रता

1- या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थी इयत्ता पहिली ते बारावी किंवा डिप्लोमा, आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी तसेच सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असणे गरजेचे आहे.

2- अर्जदार विद्यार्थ्यांनी मागील पात्रता परीक्षा मध्ये कमीत कमी 55% गुणांसह ती परीक्षा पास केलेली असावी.

3- तसेच अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असणे गरजेचे आहे.

4- महत्त्वाचे म्हणजे ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षांमध्ये काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे व यामुळे ते शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाहीत व त्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका आहे अशा विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

 या अंतर्गत दिला जाणारा फायदा

या अंतर्गत इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये आणि सातवी ते बारावी, आयटीआय तसेच डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना 18000 रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

 लागणारी कागदपत्रे

याकरिता अर्ज करताना अर्जदाराकडे त्याच्या पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच मागील वर्षाचे मार्कशीट, ओळखीचा पुराव्या करिता आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, चालू वर्षाचा शाळेतील  ऍडमिशन पुरावा यामध्ये ऍडमिशन फी पावती, प्रवेश पत्र, संबंधित शाळेचे ओळखपत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदाराची बँकेचे पासबुक/ कॅन्सल केलेला चेक( माहिती अर्जामध्ये देखील हे कॅप्चर केले जाईल), उत्पन्नाचा पुरावा( ग्रामपंचायत किंवा वार्ड समुपदेशक किंवा सरपंच यांनी जाहीर केलेला, एसडीएम किंवा तहसीलदार यांनी जारी केलेला)यापैकी एक आवश्यक,प्रतिज्ञापत्र आणि कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा( लागू असेल तर) इत्यादी कागदपत्रे लागतात.

 अंडरग्रॅज्युएट कोर्सेस साठी

) पात्रता

1- अर्जदार विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रम यामध्ये बीकॉम, बीएससी, बीए आणि बीसीए इत्यादी सामान्य अभ्यासक्रम, तसेच त्यासोबत बी टेक, एमबीबीएस, एल एल बी, बि.आर्च आणि नर्सिंग यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.

2- संबंधित अर्जदाराने मागील पात्रता परीक्षा कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.

3- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी किंवा समान असणे गरजेचे आहे.

4- तसेच ज्या अर्जदारांना मागील तीन वर्षांमध्ये काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागत आहे व त्यामुळे त्यांना शिक्षणाचा खर्च पेलणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

 अंतर्गत मिळणारा फायदा

बीए, बीकॉम आणि बीएससी सारख्या सामान्य पदवी अभ्यासक्रमान करिता तीस हजार रुपये आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमान करिता पन्नास हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

 लागणारी कागदपत्रे

वर उल्लेख केलेली कागदपत्रे याकरिता देखील आवश्यक आहेत.

 अधिक माहितीसाठी या ठिकाणी करा संपर्क

[email protected] या ईमेल आयडीवर मेल करू शकतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News