Homemade Tooth Powder : पिवळे दात चमकतील मोत्यासारखे ! बनवा घरच्या घरी टूथपावडर

Ajay Patil
Updated:
tooth powder

Homemade Tooth Powder:  बऱ्याचदा अनेक जण शरीराच्या आरोग्याकडे ज्याप्रमाणे लक्ष देतात तितके लक्ष नक्कीच दातांकडे देत नाहीत. तसेच बऱ्याच जणांना तंबाखू तसेच गुटखा खाण्याची सवय असते. त्यामुळे दातांवर पिवळे थर साचतात आणि दात पिवळे दिसायला लागतात. यापैकी बरेच जण दात पांढरे शुभ्र व्हावेत याकरिता अनेक प्रकारचे उपचार देखील करतात. परंतु याचा कुठल्याही प्रकारचा फरक दिसून येत नाही.

साधारणपणे दातांचा विचार केला तर दात पिवळे होणे तसेच दातांवर प्लॅक जमा होणे तसेच कॅव्हिटी इत्यादी प्रकारच्या समस्या दिसून येतात. त्यामुळे या समस्या दूर व्हाव्यात याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट किंवा टूथ पावडर  यांचा वापर बरेच जण करतात. परंतु त्यांच्या काही उपयोग दिसून येत नाही. त्यामुळे जर तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने दूध पावडर घरच्या घरी बनवली तर याचा नक्कीच पिवळे दात सफेद म्हणजेच चमकवण्यासाठी फायदा मिळतो. आयुर्वेदिक पद्धतीने टूथ पावडर कशा पद्धतीने बनवावी हे आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी सांगितले आहे त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेऊ.

  दात पिवळे का होतात?

दातांवर किटाणूंचे थर एकावर एक साचतात आणि दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे दात पिवळे पडतात. दातांची स्वच्छता व्यवस्थित न झाल्यामुळे बॅक्टेरिया त्यावर तसेच राहतात आणि दातांवर पिवळा थर जमायला लागतो. अतिरिक्त चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा काही आजारपणातील औषधांमुळे देखील हा प्रकार दिसून येतो. तसेच तंबाखू किंवा सिगारेटच्या सवयीमुळे देखील दात पिवळे पडण्याची समस्या उद्धवते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे काही जणांना अनुवंशिकतेमुळे देखील दात पिवळे होण्याचा त्रास होऊ शकतो.

 घरच्या घरी बनवा या टूथ पावडर

 1-पुदिना टूथ पावडर– तुम्हाला पुदिना टूथ पावडर बनवायचे असेल तर याकरिता तुम्हाला बेंटो नाईट क्ले, पेपरमिंट एसेन्शिअल ऑइल आणि लवंग तेलाचा उपयोग यामध्ये करावा लागतो. परंतु यामध्ये तेलाचा उपयोग मात्र कमी प्रमाणात करणे गरजेचे आहे. नाहीतर दात घासायला समस्या निर्माण होऊ शकते किंवा पावडर सुकी राहू शकते.

त्यामध्ये लवंग तेलाचा वापर फक्त चवीपुरता करणे गरजेचे आहे. ही पावडर तयार करताना पुदिन्याचे पाने सुकवून त्यामध्ये पेपरमेंट एसेन्शियल ऑइल आणि लवंग तेल मिक्स करून डब्यात भरून ठेवावे आणि दिवसा आणि रात्री दोन वेळा ब्रश करावा.

2- दालचिनी टूथ पावडर दालचिनी ही दातांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे. दातांमधील कॅविटी तसेच दात दुखण्याचे समस्या असेल तर दालचिनी फायद्याची  ठरते. बऱ्याच जणांना तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीची समस्या असते. त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील दालचिनीचा उपयोग होतो.

तुम्हाला जर दालचिनीची पावडर बनवायची असेल तर त्याकरिता  दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, सी सॉल्ट आणि ऍक्टिव्ह चारकोल हे सर्व एकत्रित करून घ्यावे लागेल. ही पावडर दातांसाठी खूप फायद्याचे ठरते. एका दिवसात देखील दातांचा पिवळेपणा कमी करण्याकरिता याचा फायदा होऊ शकतो.

3- बेकिंग सोडा आणि मीठ टूथ पावडर सी सॉल्ट आणि बेकिंग सोडा हे प्रत्येकाच्या घरात असते. आपण मिठाचा विचार केला तर यामध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म असून  हिरड्यांच्या आजूबाजूला जर सूज असेल तर ती कमी करण्याकरिता हिचा वापर होतो. त्यामुळे बेकिंग सोडा आणि सी सॉल्ट पावडर एकमेकात मिसळून ही पावडर घेऊन ब्रश करावा. यामध्ये बेकिंग सोडा हा दातांचा एनॅमल चमकवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe