LED Bulb Offer : फक्त 269 रुपयात घ्या दहा एलईडी बल्ब आणि विज बिलात करा 85% बचत

Ajay Patil
Published:
led bulb offer

  LED Bulb Offer: विजेची बचत ही काळाची गरज असून त्याकरिता विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपल्याला माहित आहे की बऱ्याच जणांना वाढीव वीज बिल येते व विजेचे पर युनिट दर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे छोट्या छोट्या बाबींचा अवलंब करून जितकी वीज वापरामध्ये बचत करता येईल एवढी स्वतःसाठी आणि भविष्यकाळातील विज संकटाला थांबवण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे.

आता साधारणपणे जर आपण आपल्या घराचा विचार केला तर अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपण मोठ्या प्रमाणावर विजेची बचत करू शकतो आणि विज बिल देखील कमीत कमी येईल या पद्धतीने काळजी घेऊ शकतो. मग यासाठी कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करता येईल असा जर विचार आपण केला तर यामध्ये सगळ्यात जास्त विज ही घरातील जे काही बल्ब असतात यांच्याकरिता वापरली जाते.

परंतु या जागी जर तुम्ही घरामध्ये एलईडी बल्ब वापरले तर नक्कीच विजेत बचत तर होतेच परंतु दीर्घ कालावधी करिता तुम्हाला बल्ब घ्यायची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे उत्तम दर्जाचे एलईडी बल्ब घरात लावणे खूप गरजेचे आहे. प्रकाशाच्या दृष्टिकोनातून देखील हे बल्ब खूप  चांगले असतात. या एलईडी बल्ब चा विचार केला तर हे घरातील वापरासाठी उत्तम तर असतात आणि रिचार्जेबल असल्यामुळे त्याचा खूप फायदा होतो.

 एलईडी बल्बचे फायदे आणि वैशिष्ट्ये

जर तुम्ही रिचार्जबल एलईडी बल्बचा विचार केला तर उत्कृष्ट प्रकाश देण्यासाठी हे प्रसिद्ध असून त्यांची क्षमता ही 8.5 वॅटस इतकी आहे. या बल्बमध्ये इंटरनल म्हणजेच अंगभूत चार्जेबल बॅटरी असते व ही बॅटरी 2000 mAh क्षमतेचे असते. साधारणपणे आठ ते दहा तासाच्या कालावधीची पूर्ण चार्ज होते व तिचा बॅकअप हा चार तासांचा मिळतो. या बॅटरी मध्ये रिचार्ज करता येईल यासाठी लिथियम बॅटरी चा वापर केलेला असतो.

पावसाळ्यामध्ये वीज खंडित होण्याची समस्या बऱ्याचदा उद्भवते. परंतु हे बल्ब जर तुम्ही घरात लावले तर  लाईट गेल्यानंतर देखील तुमचे घर प्रकाशमान ठेवण्यासाठी हे मदत करतात. जर तुम्ही सुरू असलेल्या होम मान्सून सेल मधून हे बल्ब घेत असाल तर तुम्हाला ते दहाच्या कॉम्बो पॅक मध्ये मिळणे शक्य आहे. तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही खोलीमध्ये यांचा वापर करू शकतात. जर टिकाऊ पणाचा विचार केला तर हे बल्ब लवकर खराब होत नसल्यामुळे जास्त काळ टिकतात.

या मान्सून सेलमध्ये या एलईडी बल्बचा एक कॉम्बो पॅक मिळत असून तो ब्रॅण्डेड व उच्च दर्जाचा आहे. या कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला दहा एलईडी बल्ब मिळत असून या बल्बच्या साह्याने तुम्हाला थंड आणि सफेद प्रकाश मिळणार आहे. विशेष म्हणजे हे बल्ब खूप कमी प्रमाणात विजेचा वापर करतात. त्यामुळे तुमच्या घराच्या बेडरूम, किचन तसेच बाथरूम सारख्या ठिकाणी देखील हे बसवू शकतात.

हा कॉम्बो पॅक 9W पावरसह मिळत असून यापासून मिळणारा प्रकाश हा इको फ्रेंडली असा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर बल्बच्या तुलनेमध्ये हे बल्ब 90% कमी विजेचा वापर करतात. हे टिकाऊ आणि दीर्घ कालावधी चालतील असे बल्ब आहेत.  जर यांची टॉप युजर रेटिंग पाहिली तर ती चार स्टार आहे.

हे सर्व पांढरे प्रकाश देणारे बल्ब असून पाच वॅट ऊर्जेची बचत करतात त्यामुळे तुमचा विजेचा वापर देखील लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते. तुम्हाला परवडेल अशा किमतीमध्ये हा एलईडी बल्ब कॉम्बो पॅक खूप फायदेशीर आहे. या पॅकमध्ये तुम्हाला दहा एलईडी बल्ब दिले जात आहेत व ते नऊ व्हॅटचे आहेत. टिकाऊ असणाऱ्या या एलईडी बल्ब तुमच्या विजेच्या वापरामध्ये 85% ची बचत करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe