MP Sujay Vikhe : भाजपने आज (दि.१३) लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यांमध्ये अहमदनगर लोकसभेची जागा खा.सुजय विखे यांना जाहीर झाली. मागील काही महिन्यांपासून सुरु असणारी खा. सुजय विखे यांच्या बाबतच्या तिकीटाची चर्चा अखेर थांबली आहे. भाजपमधील अनेक दिग्गजांनी विखे यांना विरोधात केला, तसेच काही राजकीय जाणकारांनी विखे यांचे तिकीट कापले जाणार असे भाकीत केले. परंतु या सर्वांचे अंदाज खोटे ठरवत खा. सुजय विखे यांनी तिकीट मिळवून दाखवले असे म्हटले जात आहे. भाजपच्या वरिष्ठांनी खा. सुजय विखे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या विरोधानंतरही त्यांच्यावर मात करत खा. सुराज्य विखे यांनी लोकसभेसाठी आपली वर्णी लावली आहे.
आ.राम शिंदे यांचा विरोध
भाजपचे आमदार राम शिंदे यांचा खा. सुजय विखे यांना विरोध होता. त्यांनी देखील खासदारकीची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अगदी उघडपणे खा. सुजय विखे यांना विरोध केला होता. त्यांनी आ. लंके , विवेक कोल्हे आदी विखे विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचीही तयारी केली होती. तसेच आ. शिंदे यांचा विखे यांना विरोध म्हणजे आतील बाजूने फडणवीस हेच विखे यांना विरोध करत आहेत असा सूर होता. परंतु या विरोधकांचा विरोध विखे पॅटर्न पुढे टिकला नाही. त्यांनी या विरोधानंतरही श्रेष्टींकडून तिकीट मिळवण्यात यश मिळवले.
काही भाजप पदाधिकऱ्यांचा अंतर्गत विरोध
शहरातील काही भाजप पदाधिकऱ्यांचा देखील विखे यांना विरोध होताच. तशी उघड नाराजगी अनेकदा व्यक्त देखील केली गेली. परंतु विखे यांची पॉवर या सर्वांपेक्षा मोठी असल्याचे या तिकीट वाटपावरून दिसून आले.
भाजपांतर्गत विविध दिग्गज नेत्यांचा विरोधही ठरला फेल
आ. राम शिंदे, विवेक कोल्हे, सुवेंद्र गांधी आदी भाजपमधील दिग्गजांनी विखे यांचा उघड विरोध केला. एकंदरीतच विखे यांना भाजपांतर्गत विरोध होता. त्यामुळे विखे यांना लोकसभेची तिकीट मिळणार की नाही याकडे अनेक लोक साशंकतेने पाहता होते. परंतु या विरोधाचा देखील काही परिणाम विखे यांच्या केंद्रातील इमेजवर काही परिणाम झालेला दिसला नाही.
पुन्हा विजयाची संधी
खा. सुजय विखे यांनी केलेली कामे, जनसंपर्क, माजी आ.शिवाजी कर्डीले, आ.संग्राम जगताप, कोतकर कंपनी,आ.बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे आदी मंडळींची एकत्रित बांधलेली व सोबत घेतलेली मोट व सर्वात महत्वाची म्हणजे ‘विखे पॅटर्न’ व विखे यंत्रणा या सर्व गोष्टींमुळे खा. सुजय विखे यांना पुन्हा विजयाची संधी मिळेल असे म्हटले जात आहे.
खा. सुजय विखे यांनी मानले श्रेष्टींचे आभार
अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राज्यात कार्यरत असलेले राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्यामुळे माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवास सुरू झाला असे देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे आणि ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत अशा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असे खा. सुजय विखे म्हणाले. निश्चितच या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरून आणि संघटनेतील प्रत्येक घटकाला सोबत घेत निवडणुकीला सामोरे जात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहील आणि देशाच्या जनतेची सेवा करेल व या संधीचे सोने पुन्हा एकदा करून दाखवेल अशी ग्वाही देतो असे वक्तव्य खासदर डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.