काय फरक आहे आमंत्रण आणि निमंत्रण या दोन शब्दांमध्ये? कित्येक लोकांना अजून माहितीच नाही! वाचा यामधील फरक

Published on -

बऱ्याचदा आपण संभाषण करत असताना काही शब्द वापरतो. परंतु बऱ्याचदा दोन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. परंतु ते एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु जर बारकाईने या शब्दाचा अर्थ पाहिला तर  थोड्या थोड्या फरकाने त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. परंतु तरी देखील बोलताना किंवा व्यवहारांमध्ये ते शब्द एकाच अर्थाने वापरतात.

आता साधारणपणे लग्नकार्य असो किंवा एखादा कार्यक्रम राहिला तर आपण त्या कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायला एखाद्याच्या घरी जातो किंवा आमंत्रण देत असतो. परंतु यामध्ये आपण आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन शब्द एकाच अर्थाने बऱ्याचदा वापरतो. लग्नपत्रिकांमध्ये देखील आग्रहाचे आमंत्रण किंवा निमंत्रण अशा पद्धतीचे  वाक्य आपल्याला दिसून येते. परंतु जर विचार केला तर या दोन्ही शब्दांचा अर्थ थोड्या फरकाने वेगवेगळ्या असून नेमका यांच्या अर्थामध्ये काय फरक आहे? याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 आमंत्रण आणि निमंत्रण यामध्ये काय आहे फरक?

1- आमंत्रण शब्द केव्हा वापरला जातो?- जर आपण प्रामुख्याने आमंत्रण या शब्दाचा विचार केला तर एखादा कार्यक्रम असेल व त्याची कुठल्याही प्रकारची एक रूपरेषा नसेल आणि ज्यांना आपण या कार्यक्रमाला बोलावतो ते त्यांच्या वेळेनुसार कधीही कार्यक्रमाला येऊ शकतील तरी त्या कार्यक्रमावर कुठलाही फरक पडणार नाही

अशा वेळेस आमंत्रण हा शब्द वापरतात किंवा आमंत्रण दिलं जातं. आमंत्रणाचे उदाहरणच घेतले तर वाढदिवसाची पार्टी असेल किंवा लग्नाचे रिसेप्शन वगैरे असेल तर अशा कार्यक्रमांमध्ये मुहूर्ताला विशेष महत्व नसतं म्हणून अशा कार्यक्रमांसाठी आमंत्रण दिले जाते.

2- निमंत्रण शब्द केव्हा वापरला जातो?- या उलट जर आपण निमंत्रण या शब्दाचा अर्थ पाहिला तर एखाद्या कार्यक्रमांमध्ये जर आपण कुणाला बोलवलं तर संबंधित कार्यक्रमाची वेळ ही ठराविक असते व यामध्ये कार्यक्रमाची एक रूपरेषा नियोजित असते. अशा कार्यक्रमाला बोलवणं म्हणजेच निमंत्रण असे म्हटले जाते.

परंतु जर लग्न समारंभ किंवा मुंज इत्यादी कार्यक्रमा असेल तर या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ठरलेल्या मुहूर्तामध्येच लग्न लागणे किंवा विधी होणे गरजेचे असते. त्यामुळे ज्या लोकांना या कार्यक्रमाला बोलावलेले असते त्यांना वेळेमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असते. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये निमंत्रण पाठवले जाते.

 आमंत्रण आणि निमंत्रणामधील काही महत्त्वाचा फरक

जर आपण इंस्टाग्राम सारख्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील माहितीचा आधार घेतला तर असा कार्यक्रम की ज्याला कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणारच असेल तर अशा कार्यक्रमाला आमंत्रण दिले जाते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर एखादा नियोजित कार्यक्रम एखाद्या व्यक्ती शिवाय  पार पडू शकणार नसेल तर अशा कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये पाहुण्याची हजेरी ही गरजेची असते व त्या हजेरी शिवाय कार्यक्रम पार पडणारच नाही अशी परिस्थिती असते तेव्हा निमंत्रण दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News