Rural Business Idea : किती दिवस फक्त बसून राहायचं ? यापैकी कोणताही एक व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करा, कमवा भरपूर पैसे

Ajay Patil
Published:
rural business idea

Rural Business Idea: भारताची लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून बरेच लोक हे शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे करतात. ग्रामीण भाग हा व्यवसायांच्या बाबतीत एक सुवर्णसंधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये अनेक कमी गुंतवणुकीचे आणि जास्त नफा देणारे व्यवसाय आरामात करू शकता.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही जागा किंवा एखादे दुकान भाड्याने घेण्याचे ठरवले तरी ते शहरी भागाच्या तुलनेमध्ये स्वस्तात मिळते त्यामुळे खर्च देखील कमी लागतो. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करणे अगदी सोपे असते. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये ग्रामीण भागात कमीत कमी भांडवलात चांगला आर्थिक नफा देऊ शकणारे काही व्यवसायांची माहिती घेणार आहोत.

 ग्रामीण भागात सुरू करता येणारे व्यवसाय

1- फळे भाजीपाला विक्री फळे व भाजीपाला विक्री व्यवसाय हा ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा व्यवसाय समजला जातो. या व्यवसायाची सुरुवात करताना तुम्ही भाजी मार्केट मधून  भाजीपाला विकत आणून एखाद्या मोठ्या मार्केटमध्ये विकला तरी चांगला नफा मिळू शकतो.

यामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा व्यापार उभा करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला पाच ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे भांडवल लागू शकते. व स्थानिक बाजारपेठेमध्ये भाजीपाला व फळे विक्रीचे दुकान देखील तुम्ही करू शकता. यामध्ये सुरुवातीला लागणारे भांडवल हे भाजीपालाचे दरांवर अवलंबून असल्याने मागेपुढे होऊ शकते.

Ashok Vegetable And Fruit Market Delivers Veggies At Home | WhatsHot Pune

2- किराणा दुकान किराणा दुकानाचा व्यवसाय हा देखील ग्रामीण भागातील एक छानसा व्यवसाय आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जागेचे निवड ही महत्वाची ठरते व त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे सगळे प्लॅनिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे. छोटे परंतु आकर्षक आणि छानसे किराणा दुकान टाकले तर तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. याकरिता तुम्हाला घाऊक विक्रेत्याच्या माध्यमातून किराणा माल विकत घ्यावा लागेल व उत्तम ग्राहक जोडून या व्यवसायात चांगला जम बसवता येतो. तुमच्या व्यवसायाची जाहिरात जर तुम्ही चांगले केली तर खूप अल्पावधीमध्ये हा व्यवसाय तुम्ही नावारूपाला आणू शकता.

NMC initiative, 45 grocery shops to provide home delivery service - The  Live Nagpur

3- गोबर गॅस निर्मिती व्यवसाय गोबर गॅस प्लांट उभारून तुम्ही गोबर गॅस निर्मिती करून त्याची विक्रीच्या माध्यमातून चांगला पैसा कमवू शकतात. गोबर गॅस प्लांट उभारण्याकरिता लागणारा खर्च हा त्या प्लांटच्या आकारावर अवलंबून असतो. म्हणजेच तुम्ही जर छोटा प्लांट उभारला तर कमी खर्च लागतो. साधारणपणे गोबर गॅस प्लांट उभारण्याकरिता लागणारा खर्च हा त्या प्लांटच्या घनमीटर आकारावर अवलंबून असतो. त्यामुळे ग्रामीण भागात हा व्यवसाय देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सेटल करू शकतात.

गोबर गैस बनाने की विधि | गोबर गैस के बारे में जानकारी [गोबर गैस प्लांट  लागत, सब्सिडी व चित्र]

4- सायबर कॅफे आता बऱ्याचशा गोष्टी ऑनलाइन पद्धतीने झाल्यामुळे ग्रामीण भागात सायबर कॅफे म्हणजेच इंटरनेट कॅफे व्यवसायाला  देखील मोठी डिमांड आहे. साधारणपणे 50 ते 60 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय उत्तम रित्या सुरू करू शकतात. याकरिता तुमचे स्वतःचे दुकान असेल तर ठीक नाहीतर भाड्याने एखादे दुकान घेऊन  हा व्यवसाय सुरू करू शकतात.

20 years on: India's cyber cafes disappearing as pocket internet takes over  | Latest News India - Hindustan Times

5- चहाचे दुकान ग्रामीण भागामध्ये चालणारा हा एक खूप चांगला व्यवसाय आहे. बँकेच्या माध्यमातून तुम्ही मुद्रा योजनेचा लाभ घेऊन पन्नास हजार रुपये कर्ज या व्यवसायासाठी मिळवू शकतात.  साधारणपणे 30 ते 50 हजारांमध्ये हा व्यवसाय उत्तम पद्धतीने सुरू करता येतो. कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारा हा व्यवसाय आहे.

Tea-stall owner Munir does not give up hope | The Business Standard

6-  डेअरी फार्मिंग व्यवसाय तुम्ही साधारणपणे डेअरी व्यवसायामध्ये दहा हजार रुपये गुंतवणूक करून देखील महिन्याला भरपूर पैसा कमवू शकतात. डेरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्ही दोन गाय किंवा म्हशी विकत घेऊन दूध उत्पादनाच्या माध्यमातून या व्यवसायात प्रवेश करू शकतात. तसेच तुम्हाला गाई व म्हशी खरेदीवर सरकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ देखील घेता येऊ शकतो. कालांतराने हा व्यवसाय हळूहळू वाढवत जाऊन दुधाचे उत्पादन व दुग्ध प्रक्रिया उद्योग या माध्यमातून तुम्ही या व्यवसायात जम बसवू शकतात.

Dairy Farming Business-What is dairy farming? dairy farming ideas,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe