संदिप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये परतणार ! आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली…

Published on -

Ahmednagar Police News : शिर्डी उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिर्डीहून नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती.

मिटके यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा मोहर्रम बंदोबस्त, गणेशोत्सव, त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे.

श्रीरामपूर येथे असताना दिग्रस येथील गोळीबार घटनेची परीस्थिती अत्यंत कुशलतेने त्यांनी हाताळली, तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांची सुटका त्यांनी केली असून

श्रीरामपूरातील मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. त्यांचे नगर जिल्ह्यातील काम हे उल्लेखनीय ठरलेले आहे. मिटके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील बदलीने जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe