Snakes Facts In Marathi : साप दूध पितात का ? त्याच्या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ? त्यांना ऐकू येत का ? वाचा सापाबद्दल माहित नसलेल्या ९ गोष्टी

Ajay Patil
Updated:
snake important fact

Snake Information:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने काटे म्हणजेच रोमांच उभे राहतात. नुसता साप पाहिला तरी व्यक्ती पळायला लागते. म्हणजेच सापाची भीती मानवाच्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली असते की भारतामध्ये साप चावल्यानंतर त्याच्या विषामुळे जितके मृत्यू होत नाही तेवढे नुसत्या भीतीने मृत्यू होतात असे म्हटले जाते.

तसेच सापाच्या बाबतीत विचार केला तर अनेक बाबतीत गैरसमज दिसून येतात. याला आपण अंधश्रद्धा असे देखील म्हणू शकतो. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण सापाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे सापांच्या बद्दल असलेल्या अंधश्रद्धा किंवा गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

 सापाच्या बाबतीत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी

1- समाजामध्ये एक साधारणपणे अशी धारणा आहे की 100 वर्षे जो साप जगतो त्याला त्याच्या इच्छेनुसार शरीर धारण करता येते अशा पद्धतीच्या कथा देखील आहेत की ज्यामध्ये साप नंतर मानवाचे रूप धारण करत होते. अनेक पुराणांमध्ये देखील मानवाचे सापाचे असलेले नाते वर्णिले गेलेले आहे. परंतु अशा प्रकारचे साप फक्त कथांमध्येच आढळतात. वास्तव जीवनामध्ये साप दिसतात परंतु ते माणसांपासून खूप दूर राहतात. कारण माणूस आणि साप एकत्र राहतील तर दोघांपैकी फक्त एकच जगू शकतो हे देखील तेवढेच वास्तव आहे.

2- बऱ्याचदा एखाद्या वेळेस साप मागे लागतो किंवा मागे पडतो. घाबरून न जाता ज्या प्रमाणे साप वेडावाकडा पॅटर्नमध्ये म्हणजेच झिगझ्याक पॅटर्नमध्ये धावतो अगदी त्याच पद्धतीने धावावे. जर साप सरळ प्रवास करत असेल तर तो पटकन पाठलाग करू शकतो. जर साप वेडावाकडा प्रवास करत असेल तर साप तुमचा जास्त काळ पाठलाग करू शकणार नाही.

3- सापाबद्दल असे मानले जाते की साप अंडी घालतात आणि त्या अंड्यांपासूनच सापांचा जन्म होतो. हे खरे आहे. परंतु पूर्ण सत्य देखील नाही. यामध्ये सापांच्या काही प्रजाती अंडी घालतात. तर बऱ्याच प्रजाती सस्तन प्राण्यांप्रमाणे थेट पिलांना जन्म देतात.

4- साप दूध पितात व त्यामुळेच नागपंचमीला सापांना दूध पाजले जाते अशी एक श्रद्धा आहे. परंतु असे मानले जाते की साप दूध पीत नाही आणि त्यांनी दूध प्यायले तर ते कधी कधी आजारी पडून यामुळे मरतात देखील.

5-काही चित्रपटांमध्ये आपण पाहतो की काही दृश्यात साप कोणालातरी समोहित करतो. परंतु वास्तव मध्ये असे काहीच नसून सापामध्ये कुठल्याही प्रकारची संमोहित करण्याची शक्ती नसते.

6- तसेच सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे सापाचा साथीदार किंवा त्याचा जोडीदार जर एखाद्या व्यक्तीकडून मारला गेला किंवा मेला तर साप त्याचा बदला घेतो. अशा त्याच्या जोडीदाराचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचे छायाचित्र तो त्याच्या डोळ्यात  साठवतो असे एक प्रकारे समज आहे. परंतु हे धादांत खोटे असून या पद्धतीची कुठलीही शक्ती सापामध्ये नसते व तेवढी बुद्धी देखील सापात नसते.

7- तसेच बऱ्याचदा म्हटले जाते की जेव्हा साप शंभर वर्षे जगतो तेव्हा त्याच्या डोक्यावर रत्न चमकायला लागतात. परंतु या बाबतीत अनेक सर्प पकडणाऱ्यांनी असे काही घडत नाही असे म्हटले आहे. म्हणजे नागमणी वगैरेचा प्रकार हा केवळ मनाची कल्पना आहे.

8- तसेच अनेक साप आहे ज्यांना उडण्याची क्षमता आहे असे म्हटले जाते. परंतु यामध्ये सत्य असे आहे की सापांना उडण्याची क्षमता नसते परंतु दुसरे बाजू पाहिली तर सापांचे शरीर फ्लेक्सीबल असल्यामुळे ते कित्येक मीटर पर्यंत उडी मारू शकतात. तसेच एका झाडावरून दुसऱ्या झाडावर देखील उडी मारतात. परंतु साप उडू शकत नाही.

9- बऱ्याचदा आपण पाहतो की सापाचे खेळ करणारे व्यक्ती बिन वाजवतात व त्याकडे साप आकर्षित होतो. परंतु यामागील खरे कारण पाहिले की सापाला बिन चा आवाज ऐकू येत नाही. परंतु या आवाजाच्या कंपन्यांचा प्रभाव सापावर पडतो. बिनचा आवाज ऐकल्यावर साप नाचतो. परंतु मुळात जेव्हा बिन हालत असते तेव्हा तो त्याकडे पाहून त्या बिनला शिकार समजतो व त्याला पकडण्याच्या उद्देशाने त्या पद्धतीने हालचाल करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe