Snake Information: भारतात आढळणारे ‘हे’ साप आहेत खूपच खतरनाक! 5 फूट अंतरावरून व्यक्तीवर करू शकतात हल्ला

Published on -

Snake Information:- जगाचा आणि भारताचा विचार केला तर सापांच्या अनेक प्रजाती असून या प्रजातींपैकी काही विषारी प्रजाती आहेत तर काही बिनविषारी प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती इतक्या विषारी आहेत की सर्पदंशानंतर काही सेकंदातच व्यक्तीचा बळी जाऊ शकतो. भारतामध्ये एकंदरीत सापांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्यापैकी सर्वात खतरनाक किंवा धोकादायक या 11 प्रजाती आहेत.

या 11 प्रजातींपैकी जर आपण रसेल वायपर या प्रजातीचा विचार केला तर ही सर्वात रागिट आणि धोकादायक समजली जाणारी सापाची प्रजात असून ती पाच फूट दूर उभे असलेल्या व्यक्तीवर देखील हल्ला करू शकतो. एवढेच नाही तर या सापाच्या दंशानंतर तात्काळ शरीरावर सूज येते व किडनी देखील निकामी होण्याची शक्यता असते.

यापैकी आपण भारतातील काही महत्त्वाच्या विषारी सापांची माहिती घेणार आहोत आणि याच प्रकारच्या सापाने जर चावा घेतला तर शरीरावर कुठला परिणाम होऊ शकतो? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती देखील घेणार आहोत.

 भारतातील सर्वात विषारी साप आणि त्यांच्या चाव्यानंतर शरीरावर होणारे परिणाम

1- कोब्रा या जातीच्या सापाने जर चावा घेतला तर त्याच्या विषाचा शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन शरीराला लकवा होतो. या जातीचा साप भारताच्या सर्व भागांमध्ये आढळून येतो. याच जातीच्या सापाला आपण नाग असे देखील म्हणतो. भारतामध्ये साप चावण्यामुळे जे काही मृत्यू होतात त्यापैकी बहुतेक मृत्यू कोब्रा चावल्यामुळे होत असतात.

या जातीच्या सापाच्या विषयांमध्ये सीनोप्टीक न्यूरोटॉक्सिन आणि कार्डिओटॉक्सिन प्रकारचे विष असते. ह्या जातीचा साप चावल्यानंतर काही वेळामध्ये शरीरातील मज्जा संस्था काम करणे थांबवते आणि अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. तसेच दृष्टी देखील जाऊ शकते. कोब्रा जातीच्या सापाची लांबी एक मीटर ते दीड मीटर पर्यंत असते.

Cobra | San Diego Zoo Animals & Plants

2- रसेल वाइपर सापाची ही प्रजात खूपच धोकादायक असून ह्या प्रजातीचा साप एका वेळी 250 ग्रॅम पर्यंत विष सोडतो. दिसायला हा साप अजगरासारखा दिसतो व खूप धोकादायक असतो. मनुष्याला जर या जातीच्या सापाने एकदा चावा घेतला तर एकाच वेळेमध्ये 120 ते 250 ग्रॅम विष शरीरामध्ये सोडतो.

हा साप चावल्यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि मूत्रपिंडामध्ये त्या पसरतात व शरीर पूर्णपणे सुजते व त्वचेला तडे जायला लागतात. रसेल वायपर हा साप इतका आक्रमक असतो की काही सेकंदात पाच फूट दूर उभे असलेल्या माणसाला देखील जावा घेऊ शकतो. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या सापाचा सर्वाधिक धोका असतो.

Russell's Viper | Rahul Alvares

3- क्रेट ह्या प्रजातीचा साप सहसा रात्री झोपेत असताना जास्त करून हल्ला करतो. हा भारतातील सर्वात विषारी साप असून चावल्यानंतर बाहेर पडणारे विष हे एका वेळी 60 ते 70 लोकांचा बळी घेऊ शकतो. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्री झोपलेल्या लोकांवर आणि तेही हात, पाय तसेच तोंड आणि डोक्यावर प्रामुख्याने चावा घेतो.

या सापाच्या चाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप चावल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाही व माणसाचा झोपेतच मृत्यू होतो. क्रेट जातीचा साप खूप पातळ आणि लांब असतो व शरीरावर काळ्या चमकदार रंगासोबतच एक पांढरी गोलाकार रेषा असते.

Common krait - Wikipedia

4- सा स्केल हा साप बहुदा राजस्थान राज्यातील भीलवाडा येथील डोंगराळ आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. इतर सापांच्या तुलनेमध्ये हा आक्रमक असून तो विषारी देखील आहे. या जातीच्या सापाची लांबी खूपच लहान असते. शरीरावर तपकिरी रंग आणि त्यावर काळे पांढरे ठिपके असल्यामुळे ते खूपच धोकादायक असे दिसते. सा स्केल प्रजातीचा साप हा देशातील सर्वात रागीट आणि आक्रमक सापांच्या श्रेणीमध्ये येतो.

Echis - Wikipedia

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe