State Employee News : यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना एक सारखा गणवेश अन राज्यस्तरावरून गणवेश देण्याची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. यामुळे वाद-युक्तिवाद आणि आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले.
अनेकांनी याचे स्वागत केले तर काहींनी यामुळे भ्रष्टाचाराला मोकळीक मिळेल असा कटाक्ष केला. दीपक केसरकर यांनी घोषणा केली मात्र याचे आदेश काही जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नाहीत.
यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश कसा मिळणार आणि केव्हा मिळणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडला होता. मात्र आता राज्य सरकारकडून 30 मे 2023 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा :- चिंताजनक ! मान्सूनचे आगमन तब्बल ‘इतके’ दिवस उशिराने होणार? 11 दिवसापासून मान्सून अंदमानातच, IMD काय म्हणतंय पहा….
काल अर्थातच 30 मे 2023 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत 2023 24 या शैक्षणिक वर्षात लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती वरून गणवेश उपलब्ध करून द्यावेत असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना हे आदेश प्राप्त झाले आहेत.
यामुळे आता राज्यातील 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याच्या सूचना यावेळी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळणार आहेत.
हे पण वाचा :- कर्ज घेण्याचा प्लॅन आहे का? मग लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर लागतो? हे जाणून घ्या
वास्तविक विद्यार्थ्यांना प्रति लाभार्थी दोन गणवेश दिले जाणार आहेत. यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये तरतूद आहे. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश दिला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात प्रति विद्यार्थी तीनशे रुपये गणवेश साठी मिळणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मोफत गणवेश कोणाला मिळणार?
राज्यातील 37 लाख 38 हजार 131 विद्यार्थी मोफत गणवेशासाठी पात्र आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवी इयत्ता मधील सर्व मुली, अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….