Success Story : 12 रुपये घेऊन सोडले घर आणि उभे केले 12.50 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य, वाचा या उद्योगपतीचा खडतर प्रवास

Ajay Patil
Published:
sawaji dholkiya

Success Story :- समाजामध्ये जगत असताना आपण असे अनेक व्यक्ती पाहतो की आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून अनेक प्रकारचे संघर्ष करत मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर ते उच्च पदावर पोचलेले असतात. मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आणि उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे त्यांना आयुष्यातील प्रवासामध्ये कितीही खडतर मार्गक्रमण करावे लागले तरी ते मागे हटत नाहीत व त्यांना जे काही मिळवायचे असते ते मिळवतातच.

परिस्थितीला पाहून किंवा परिस्थितीचे कारण देऊन रडत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत  प्रगती करण्यात जीवनाचे सार्थक आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांचा जीवन प्रवास पाहिला तर वरील मुद्दा त्यांना तंतोतंत लागू होतो. अगदी बारा रुपयांपासून सुरुवात केलेल्या या हिरे उद्योजकाने आज कोट्यावधींचे साम्राज्य उभे केले आहे.

 सावजीभाईंचा खडतर प्रवास

सावजीबाई हे गुजरात राज्यातील मरेली या जिल्ह्यात असलेल्या दुधाला या गावचे रहिवासी असून फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतले आहे. जर त्यांचा हा प्रवास पाहिला तर तो 1977 साली फक्त साडेबारा रुपये घेऊन जेव्हा सुरत आले तेव्हापासून सुरू झाला. म्हणजे सोबत असलेले हे साडेबारा रुपये त्यांचे बसच्या भाड्यांमध्येच खर्च झाले व मनात जिद्द असल्यामुळे त्यांना या अडचणी  सोडवण्यामध्ये काहीच वाटले नाही व आज त्यांचा प्रवास जर पाहिला तर त्यांची संपत्ती साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सुरत शहरातील ते एक प्रसिद्ध हिरे व्यापारी असून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले प्रेमाच्या बाबतीत देखील ते ओळखले जातात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले त्यांचे प्रेम जर पाहिले तर त्यांनी काही कर्मचाऱ्यांना घर तसेच कार, मोपेड आणि एवढेच नाही तर काही कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार देखील भेट म्हणून दिलेले आहेत. परोपकारी आणि नम्रता या गुणांनी प्रसिद्ध असलेले सावजीभाई एक दिलदार व्यक्ती म्हणून देखील ओळखले जातात. प्रत्येक दिवाळीला कर्मचाऱ्यांना भव्य दिव्य असे बोनस देण्यासाठी ते जागतिक स्तरावर देखील प्रसिद्ध आहेत.

तेराव्या वर्षी त्यांनी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडले व 1977 यावर्षी 12:30 रुपये घेऊन सुरत या ठिकाणी त्यांच्या मामाच्या घरी पोहोचले. त्यांचे मामा देखील एक हिरे व्यापारी होते व मामांकडूनच त्यांनी हिऱ्याच्या व्यवसायातील सगळे बारकावे शिकले. सुरत या ठिकाणी त्यांनी अगोदर एका फॅक्टरीमध्ये 179 रुपये प्रति महिना इतक्या पगारावर नोकरी केली. या 179 रुपयांमधून 140 रुपये खर्च खाण्यापिण्यावर होत असे व 39 रुपये ते त्यामधून बचत करायचे.

त्याच फॅक्टरीमध्ये ते त्यांच्या मित्रांकडून हिरे ग्राइंडिंगचे काम शिकले व दहा वर्षे हिरे घासण्याचे काम केले. सावजीभाईंची कमाल पाहिली तर ज्या कंपनीमध्ये त्यांनी काम केले त्याच कंपनीचे ते मालक बनले. 1984 यावर्षी त्यांनी त्यांचे बंधू हिम्मत आणि तुलसी यांना सोबत घेऊन हरिकृष्ण एक्सपोर्ट्स नावाची एक कंपनी सुरू केली. ही कंपनी हिरे आणि टेक्स्टाईल विभागामध्ये काम करायची. सुरुवातीला ज्या कंपनीमध्ये कामगार म्हणून त्यांनी काम केले त्याच कंपनीचे ते आज मालक असून त्यांचे कापड व हिरे उद्योगांमध्ये 6000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.

 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले विशेष प्रेम

दिवाळी बोनस म्हणून ते कर्मचाऱ्यांना घरे तसेच कार आणि मोपेड देखील देतात. त्यांच्या हरे कृष्ण डायमंड कंपनीने 25 वर्षापासून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारे जे काही तीन मॅनेजर होते त्यांना 1.1 कोटी रुपयांच्या मर्सिडीज गाडी देखील भेट दिली आहेत. त्यांच्या दिलदारपणाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आठ वर्ष सावजी ढोलकिया यांच्याकडे काम केल्यानंतर दिलीप नावाच्या त्यांच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या पत्नीला चक्क एक कोटी रुपयांचा चेक देखील सावजी ढोलकीया यांनी दिला होता. या उदाहरणांवरून त्यांचे कर्मचाऱ्यांबद्दल असलेला आदर देखील दिसून येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe