Success Story: 14 व्या वर्षी केबीसीमधून करोडपती ते आता आयपीएस ऑफिसर! वाचा या अधिकाऱ्याचा खडतर प्रवास

Ajay Patil
Published:
ravi mohan saini

Success Story:- समाजामध्ये आपण असे अनेक लहान मुले बघतो की ते अगदी कमीत कमी वयामध्ये खूप चाणाक्ष आणि बुद्धिमान असतात. त्यांचे एखादे कौशल्य पाहून आपल्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आपण अनेक टीव्हीवर रियालिटी शो बघतो जसे की डान्स प्रोग्राम किंवा गाण्यांचा प्रोग्राम यामध्ये खूप लहान वयातले मुलं जेव्हा डान्स करतात किंवा गातात तेव्हा आपल्याला पाहून विश्वास बसत नाही एवढे कौशल्य त्यांच्यामध्ये भरलेले असते.

इतर कौशल्यांसोबतच अशी अनेक लहान वयातली मुलं आणि मुली अभ्यासात देखील तितकेच हुशार असतात. अगदी याच पद्धतीने जर आपण कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचा विचार केला तर हा एक खूप महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम असून सध्या या कार्यक्रमाच्या 15 वा सीजन सुरू आहे.

परंतु या केबीसीचा माध्यमातून काही वर्षांपूर्वी केबीसी जुनियर  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. साधारणपणे 2001 मध्ये लहान मुलांकरिता या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती व याच केबीसी जुनियरच्या सीजनमध्ये रवी मोहन सैनी या अवघ्या 14 वर्षाच्या मुलाने त्यावेळेस एक कोटी रुपये जिंकले होते. हाच रवी मोहन सैनी  सध्या काय करतो? तो कुठे आहे? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 2001 मध्ये रवी मोहन सैनी केबीसीमधून झाले होते करोडपती

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 2001 मध्ये केबीसी जुनियर हा कार्यक्रम  लहान मुलांकरिता आयोजित करण्यात आलेला होता व या कार्यक्रमांमध्ये सर्व प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे देत रवी मोहन सैनी याने अवघ्या चौदाव्या वर्षी एक कोटी रुपये जिंकले होते दहावीत शिकत असताना केबीसी जुनियर मध्ये रवी सैनि सहभागी झाले होते व अमिताभ बच्चन यांना भेटता यावे म्हणूनच या शोमध्ये येण्याची त्यांची इच्छा होती.

हीच इच्छा त्यांना केबीसी ज्युनिअरच्या प्लेटफॉर्म पर्यंत घेऊन आली. परंतु त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते की ते यामधून कोट्याधीश होतील. परंतु रवी सैनी यांनी अवघ्या चौदाव्या वर्षी केबीसी जुनिअर मधील पंधरा प्रश्नांची अचूक उत्तर देत एक कोटी रुपये एवढी रक्कम देखील जिंकली होती.

हेच रवी मोहन सैनी सध्या गुजरात राज्यातील पोरबंदर मध्ये सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात एसपी या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहेत.ते राजस्थान राज्यातील अलवार या ठिकाणचे रहिवासी असून त्यांचे वडील इंडियन नेव्ही मध्ये होते व त्यांच्याकडूनच त्यांनी प्रेरणा घेतली व पोलीस दलात ते दाखल झालेत.

 अधिकारी पदापर्यंत कसे पोहोचले?

राजस्थान मधील अलवार जिल्ह्यातील रहिवासी असलेले रवी मोहन सैनी यांचे वडील इंडियन नेव्ही मध्ये होते व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी पोलीस दलामध्ये दाखल होण्याचे निश्चित केले. या आधीच्या कालावधीमध्ये अगोदर त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करत राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले व जेव्हा मेडिकल इंटर्नशिप दरम्यान ते यूपीएससीच्या परीक्षेला बसले.

परंतु या अगोदर त्यांनी या परीक्षेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर तयारी केली. तयारी करत असताना कुठल्याही कोचिंग क्लासेसचा आधार न घेता स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले व प्राथमिक चाचणी देखील उत्तीर्ण केली. परंतु मेन्सला अपयश आले व थोड्या प्रयत्नाने ते मागे पडले. परंतु निराश न होता त्यांनी पुन्हा कष्टाने या परीक्षेची तयारी केली व 2013 मध्ये पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांमध्ये यश संपादन केले.

त्यानंतर त्यांनी भारतीय पोस्ट आणि टेलिकॉम विभागाच्या अकाउंट्स आणि फायनान्स या दोघेही सेवांमध्ये स्थान पक्के केले. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा त्यांनी नागरी सेवा परीक्षेमध्ये प्रयत्न करण्याचे ठरवले व यावेळी मात्र संपूर्ण भारतामध्ये 461 हा रँक गाठला. आता ते गुजरात राज्यातील पोरबंदरचे पोलीस अधीक्षक  म्हणून 2021 मध्ये नियुक्त झाले. म्हणजेच 2001 मध्ये केबीसी ज्युनिअर मध्ये करोडपती झालेला हा मुलगा 22 वर्षानंतर गुजरात राज्यातील पोरबंदर येथे एसपी म्हणून कार्यरत झाला असून हा प्रवास त्यांचा खूप प्रेरणादायी आहे.

  अशाप्रकारे रवी सैनी यांचा प्रवास पाहिला तर तो पहिल्यापासून अभ्यास आणि कष्ट आणि अचूक दिशेने केलेले प्रयत्न त्यामुळे ते आता एसपी या पदापर्यंत पोहोचलेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe