Success Story: लग्नाच्या 15 दिवसानंतर नवऱ्याने सोडली साथ! तरीही न खचता बनली आयआरएस ऑफिसर, वाचा कोमल गणात्रा यांची यशोगाथा

Ajay Patil
Published:
komal ganatra

Success Story:-बरेच व्यक्ती आयुष्यामध्ये खूप अशा कौटुंबिक आणि सामाजिक तसेच आर्थिक अडचणींना तोंड देतात व अशा अडचणींना धीराने तोंड देत देत आपला यशाच्या मार्ग सुकर करत असतात. यामध्ये प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये असतेच परंतु  स्वतःच्या ध्येयावर प्रेम असते व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणींना दुय्यम स्थान देऊन त्यांना एवढे महत्त्व न देता या अडचणीतून मार्ग काढत ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर  या सगळ्यात कठीण परीक्षा म्हणून ओळखल्या जातात. अशा परीक्षा अनंत अडचणींना तोंड देऊन उत्तीर्ण करणे हे खूप दिव्य काम आहे. परंतु बरेच अधिकारी आपण पाहिले तर आर्थिक अडचणींवर मात करत प्रचंड प्रमाणात अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतात व नागरी सेवेत दाखल होतात. याच पद्धतीची जर यशोगाथा आपण इंडियन रेवेन्यू सर्विस अर्थात आयआरयाएस मध्ये ऑफिसर असलेल्या कोमल गणात्रा यांची पाहिली तर अनंत अडचणींना तोंड देत त्यांनी या पदापर्यंत मजल मारली.

 आयआरएस ऑफिसर्स कोमल गणात्रा यांची यशोगाथा

कोमल गणात्रा या इंडियन रेवेन्यू सर्विस अर्थात आयआरएस ऑफिसर असून या पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास हा खूप खडतर आणि अनंत अडचणींनी भरलेला आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करून त्या आज एक यशस्वी अशा महिला ठरल्या आहेत.

जर आपण त्यांच्या आयुष्याचा विचार केला तर एक सुस्थितीत व चांगला आयुष्य त्यांचं होतं व सामान्य मुलींप्रमाणेच त्यांनीही त्यांच्या लग्नाची स्वप्न पाहिलेली होती व ती रंगवलेली होती. परंतु लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसातच त्यांचे हे स्वप्न पार रसातळाला गेल. लग्नाच्या पंधरा दिवसातच त्यांचा एनआरआय असलेला नवऱ्याने त्यांना सोडून दिले व तो न्यूझीलंडला चालला गेला. त्यानंतर आयुष्यात अंधार पसरला.

परंतु न डगमगता त्यांनी त्यांच्या वडिलांपासून दूर पाहून एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली व प्रतिमाह पाच हजार रुपये पगारावर त्या ठिकाणी काम करणे सुरू केले. परंतु ही नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या तयारी मध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात अभ्यास केला व नियोजन व्यवस्थित ठेवल्यामुळे चौथ्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. आज त्यांच्या कष्टाला फळ मिळाले असून त्यांची नियुक्ती आयआरएस अधिकारी म्हणून झाली आहे.

 वडिलांचा सल्ला ठरला मोलाचा

जेव्हा त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला तेव्हा त्यांच्या वडिलांनी कोमल यांना शिक्षणाचा रस्ता दाखवला. कोमल यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हटले की तू खास असून तू खूप महत्त्वाची आहे व तुला तुझ्या आयुष्यात खूप पुढे जायचे आहे व तू आयुष्यात सर्व काही करू शकते.

या आधाराच्या बोलाने कोमल आयुष्यामध्ये पुढे सरसावल्या व त्यांनी आयुष्यात सर्व काही करून दाखवले. त्यांच्या यशाविषयी बोलताना कोमल म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही किंवा आपला विकास आपण स्वतः करू शकत नाही.

जर आपण कोमल गणात्रा यांच्या शिक्षणाचा विचार केला तर त्यांना तीन भाषा येतात व या तीनही भाषांमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. आज त्यांच्या आयुष्यात खूप चांगले दिवस आले असून त्यांचं दुसरं लग्न झालं व त्यांचे पती गुजरात मधील जुडीशियल मॅजिस्ट्रेट असून त्यांच्या नाव मोहित शर्मा असे आहे. आज त्यांना एक मुलगी असून ती सात वर्षाची आहे. सध्या कोमल गणात्रा यांची पोस्टिंग दिल्लीत असून ते आपल्या मुलीला  भेटायला येत असतात.

अशाप्रकारे आयुष्यात आलेल्या अडचणींना न घाबरता त्यांच्यावर प्रयत्न आणि कष्टाने मात करून यशस्वी होता येते एक कोमल गणात्रा यांनी दाखवून दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe