Tourist News : 1001 दिवसात पूर्ण करा जगाची वारी! कसे ते वाचा?…

Published on -

Tourist News :- पर्यटनाच्या बाबतीत हौशी असलेले लोक भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या खर्चाचा विचार न करता जगाची सैर करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. साहजिकच जागतिक स्तरावर जर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी नक्कीच पैसा खूप जास्त प्रमाणात लागतो आणि वेळ देखील तितकाच खर्च होत असतो हे मात्र निश्चित.

भारतातून किंवा संपूर्ण जगभराचा विचार केला तर अनेक पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्या जगाच्या पाठीवरील असलेल्या पर्यटन स्थळांसाठी उत्तम पॅकेजच्या माध्यमातून छानशी परदेशवारी  आयोजित करतात. जर आपण प्रामुख्याने विचार केला तर अशी विदेशवारी ही विमानाच्या माध्यमातून पार पाडले जाते.

परंतु विदेशात फिरण्याची अशीच एक संधी चालून आली असून जर तुम्हाला फिरायचे हौस असेल तर तुम्ही ही परदेशवारी जहाजाच्या माध्यमातून तब्बल 1001 दिवसात पूर्ण करू शकणार आहात. याबद्दलचेच महत्त्वाचे माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Life At Sea Cruises या कंपनीची एमव्ही लारा क्रूज लोकांना घडवेल जगाची सफर

बद्दलचे सविस्तर माहिती अशी की,Life At Sea Cruises या कंपनीची एमव्ही लारा क्रूजच्या माध्यमातून आता लोकांना संपूर्ण जगाच्या एका अनोख्या आणि मजेशीर अशा प्रवासावर घेऊन जाणार असून ही परदेशवारी 1001 दिवसांमध्ये पूर्ण होणार असून या कालावधीमध्ये तुम्हाला तब्बल 140 देशांना भेट देता येणार आहे.

याबद्दल या कंपनीच्या सीईओंनी सांगितले आहे की, ज्या लोकांना आपल्या दैनंदिन आयुष्यातील काम व पर्सनल लाईफ यामध्ये योग्य संतुलन ठेवायचे असेल अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही टूर आयोजित करण्यात आलेली आहे. जे लोक अशा परिस्थितीमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट वर करत आहेत ते या टूर साठी जाऊ शकतात.

या टूरमध्ये एमव्ही लारा क्रूज या जहाजाच्या माध्यमातून जगातील सात खंडातील 140 देश आणि 382 बंदर इत्यादी ठिकाणी जाणार आहे. या विदेशवारीमध्ये रोम, भारत तसेच उत्तर अमेरिका, चीन, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये जाता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या टूर्ससाठी जे पर्यटक जातील त्यांना जगातील 13 आश्चर्य देखील बघायला मिळणार आहेत यासोबतच जास्तीत जास्त वेळ पोर्ट टाईम देखील मिळणार आहे.

त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक देशामध्ये पुरेसा वेळ व्यतीत करता येऊ शकणार आहे. या संपूर्ण टूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी म्हणजेच प्रवाशांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची उत्तम अशी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या क्रूज मध्ये पुल तसेच जिम, ऑडिटोरियम, स्पा आणि उत्तम अशा रेस्टॉरंटची देखील सुविधा असणार आहे.

 किती आहे भाडे?

या क्रूजवर तीन वर्षाच्या प्रवासासाठी डबल ॲक्युपॅन्सी म्हणजेच दोन लोकांकरिता तुम्हाला प्रत्येक वर्षाला 77 हजार 26 डॉलर इतके भाडे भरावे लागणार आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये या भाड्याचा विचार केला तर ते तब्बल 63 लाख 78 हजार 523 रुपये इतके होते. अजून 85 दिवसानंतर हा प्रवास सुरू होणार असून एक नोव्हेंबर 2023 रोजी इस्तंबूल या ठिकाणहून ही क्रूज प्रवास सुरू करेल.

 तिकीट कुठे बुक करता येईल?

या टूर साठी तिकीट बुक करायचे असेल तर ते https://www.lifeatseacruises.com या संकेतस्थळावर करता येणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News