Tourist Place In Mumbai:- मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे एक शहर असून संपूर्ण जगामध्ये विविध दृष्टिकोनातून मुंबई प्रसिद्ध आहे. लाभलेला समुद्रकिनारा, बॉलीवूडचे केंद्र असे अनेक प्रकारची मुंबईची ओळख आहे. मुंबईला सिटी ऑफ ड्रीम म्हणजे स्वप्नांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
पर्यटनाचा विचार केला तर मुंबईमध्ये खूप प्रमाणात विविध प्रकारची पर्यटन स्थळे असून यामध्ये विविध प्रकारचे संग्रहालय तसेच धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक उद्यानांचा समावेश आहे. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला मुंबईत फिरायला जायचे असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. यातील काही पर्यटन स्थळाविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ.

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1- मुंबईतील चौपाटी आणि जुहू बीच– मुंबईला समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात लाभला असून मुंबईतील समुद्रकिनारे हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप उत्तम अशी ठिकाणे आहेत. या समुद्रकिनारांवर बसून सूर्यास्ताचे दर्शन किंवा शांत सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच आहे. या ठिकाणी बसून फेसाळणारे आणि चकाकणारे समुद्राचे पाणी पाहण्यामुळे मन अतिशय शांत होते.
मुंबईतील चौपाटी मरीन ड्राईव्ह जवळील म्हणजेच गिरगाव समुद्रकिनारा मुंबईतील सर्वात व्यस्त असलेला समुद्रकिनारा असून या ठिकाणी तुम्हाला अनेक स्थानिक स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात. मुंबई उपनगरातील जुहू बीच हा मुंबई शहरातील सर्वाधिक गर्दीने फुललेला समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी कायमच पर्यटकांची वर्दळ असते.
हा सहा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असून मुंबईतील सर्वात लांब समुद्रकिनारा म्हणून देखील ओळखला जातो. या ठिकाणी तुम्हाला चविष्ट असे स्ट्रीट फूड खायला तर मिळतातच परंतु त्यासोबतच तुम्हाला बनाना राइड्स, जेट स्की आणि बंपर राईड्स सारख्या जलक्रीडा करता येतात. तसेच या व्यतिरिक्त पर्यटकांना अक्सा बीच तसेच वर्सोवा बीच आणि गोराई बीच यासारख्या ठिकाणी देखील भेट देता येऊ शकते.
2- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान– संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवली मध्ये असून याला मुंबईचे लंग म्हणजेच फुफ्फुस असे देखील म्हणतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहरी भागामध्ये वसलेले जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. साधारणपणे 103 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या उद्यानात अनेक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य पाहायला मिळतात. हे एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चालना देणारे ठिकाण असून हे एक संरक्षित जंगल आहे.
या ठिकाणी तुम्हाला रोमांचकारी वाघाच्या आणि सिंहाच्या सफारी पाहायला मिळतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरक्षित कुंपणाच्या आत मध्ये ग्रीन बस ने प्रवासकरता येतो. कारण कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे याकरिता या बसेस पिंजऱ्यात ठेवल्या जातात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनस्पतींच्या एक हजार पेक्षा जास्त प्रजाती असून सस्तन प्राण्यांच्या चाळीस प्रजाती या ठिकाणी आहेत. तसेच या उद्यानाच्या आतमध्ये कान्हेरी लेणी असून या लेणी इसवी सन पूर्व पहिल्या आणि नवव्या शतका दरम्यान बांधण्यात आले आहे.
3- हाजी अली– मुंबईतील समुद्राच्या मध्यभागी तरंगणारा आणि या ठिकाणी सर्व धर्माचे लोक भेट देऊ शकतील असा हाजी अली दर्गा हा एक प्रसिद्ध असा दर्गा मुंबई मध्ये आहे. या ठिकाणी पंधराव्या शतकातील सुपी संत पिर हाजी अली शहा बुखार यांचे कबर आणि अवशेष आहेत. हाजी अली दर्गा हा समुद्रामध्ये असून किनाऱ्यापासून पाचशे मीटर अंतरावर एकाछोट्या बेटावर आहे.
या दर्ग्यामध्ये एक भव्य संगमरवरी थडगे तसेच इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचे वैशिष्ट्यपूर्ण असे चित्र, मशीद तसेच मिनार आणि कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार देखील आहे. या दर्ग्याचे बांधकाम मकराना संगमरवर वापरून बांधण्यात आले आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा पाण्याखाली जातो. पुढे जेव्हा समुद्राला ओहोटी असते तेव्हाच या प्रसिद्ध दर्ग्याला पर्यटक भेट देऊ शकता.
4- नेहरू तारांगण– नेहरू तारांगण हे नेहरू सायन्स सेंटर चा एक भाग असून लहान मुलांना भेट देता येईल अशा ठिकाणांपैकी हे एक उत्तम ठिकाण आहे. नेहरू तारांगणाची स्थापना 1977 मध्ये वरळी मुंबई या ठिकाणी करण्यात आली व हे देशातील सर्वात प्रगत असे तारांगण आहे. वास्तु विशारद जे एम कादरी यांनी डिझाईन केलेले दंडगोलाकार रचना आणि सुंदर पांढरा घुमट, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणाकरिता एक प्रमुख ठिकाण आहे.
या ठिकाणी एक थ्रीडी आय मॅक्स थेटर असून या ठिकाणी मोठ्या स्वरूपातील चित्रपट त्रि आयामी स्वरूपामध्ये प्रोजेक्ट केले जातात. ज्यांना खगोल निरीक्षणाची हाऊस असते अशा व्यक्तींकरिता या ठिकाणी दुर्बिणी आहेत. या ठिकाणी असलेले विविध प्रकारची सभागृह आणि दालन तसेच विविध प्रकारचे प्रदर्शने देखील आहेत. या ठिकाणचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया असून या ठिकाणी भारतात घडलेल्या ऐतिहासिक घटना आणि वास्तुशास्त्र यांच्या माध्यमातून भारतात घडलेल्या बदलांची माहिती आपल्याला होते.
5- गोरेगाव फिल्मसिटी– गोरेगाव फिल्मसिटी लाच दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून देखील ओळखले जाते. ही फिल्म सिटी 520 एकर वर पसरलेली असून आरे कॉलनी मुंबई येथे सुमारे वीस इनडोअर स्टुडिओ आणि 42 बाह्य शूटिंगची स्थाने या ठिकाणी आहे. या फिल्म सिटी मध्ये एकाच वेळी शंभर फिल्म सेट उभारता येऊ शकतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर या ठिकाणी अनेक बॉलीवूड चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. गोरेगाव फिल्मसिटी हे पश्चिम मुंबई उपनगरात असून निर्जन आणि हिरवेगार आरे कॉलनीच्या परिसरात आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर भागात आहे.