Vande Bharat News: भारतामध्ये सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस माध्यमातून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवली जात असून आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास करता येणे शक्य झाले आहे.
जर आपण या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून आधीच मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर अशा मार्गांवर वंदे भारत सुरू आहे. परंतु मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये नागपूरवरून परत तीन नवीन वंदे भारतीय एक्सप्रेस सुरू करण्याचे प्लॅनिंग रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असून या तीनही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर या ठिकाणहून राज्यातील आणि राज्याबाहेरील शहरांमध्ये धावणार आहेत.
नागपूर वरून तीन नवीन वंदे भारतीय एक्सप्रेस होणार सुरू?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूरहून नागपूर ते पुणे, नागपूर ते भोपाळ आणि नागपूर ते हैदराबाद या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्लॅनिंग रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून या तीन मार्गांवर वाहतूक सर्वे देखील करण्यात आलेला आहे.
वाहतूक सर्वे रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार नागपूर विभागाने केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की नागपूर ते पुणे या दोन शहरा दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू का करण्यात येत नाही? व या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनीही वाहतूक सर्वेबाबत माहिती दिली.
त्यांनी म्हटले की नागपूर ते पुणे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याला प्राधान्य आहे परंतु पुणे रेल्वे स्टेशनवर नवीन गाड्या उभ्या करण्याची कुठलीही सोय नसल्यामुळे याकरिता आता पर्याय शोधण्यात येत आहे. त्यामुळेच आता रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार नागपूर ते पुणे, नागपूर ते हैदराबाद आणि नागपूर ते भोपाळ या मार्गावरील वाहतूक सर्वे पूर्ण करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबींचा सविस्तर अभ्यास देखील करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.