Post office : पोस्टाची आकर्षक योजना! घरबसल्या महिन्याला मिळतील ‘इतके’ पैसे, लगेचच करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office : अनेकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यात अनेकांचा कल असतो. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता.

दरम्यान, पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. यातील योजना जोखीममुक्त आणि शानदार परताव्यासह येतात. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. आता तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळतील. काय आहे ही भन्नाट योजना जाणून घ्या.

खरं तर ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना एका खात्यात 4.5 लाख रुपये गुंतवता येतात. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर तुम्ही त्यात 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये गुंतवून महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकता.

मिळेल महिन्याला 5 हजार रुपयांचे व्याज

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत 6.6 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. समजा तुम्ही योजनेत 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक वर्षी 59,400 रुपये व्याज मिळते. यानुसार, तुम्ही प्रत्येक महिन्याला 4,950 रुपये कमी करू शकता. एका खात्यातील 4.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला 2,475 रुपये व्याज म्हणून मिळतील.

कधी करता येते गुंतवणूक?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत कोणत्याही व्यक्तीला वयाच्या 10 व्या वर्षी खाते उघडता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराकडे आवश्यक कागदपत्रे म्हणजे की आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो इ. या कागदपत्र लागतात. आता तुम्ही पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरून हे खाते चालू करू शकता.

हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी योजना घेऊन येत असते. तसेच यामध्ये बऱ्याच बचत योजना देखील आहेत. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम खूप आवडली असून या योजनेमध्ये व्याजासह सवलत मिळते. तर त्याच वेळी, या आर्थिक वर्षात त्याच्या व्याजदरात बदल केला आहे. आता या योजनेचा व्याजदर 6.8 टक्के करण्यात आला आहे.