Author Heramb Kulkarni News : सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ल्याचा प्रकार धक्कादायक होताच. परंतु ही घटना झाल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांसोबत जे पोलिसांनी केलं ते मात्र जास्तच धक्कादायक होत अशी चर्चा रंगलीय. कारण कुलकर्णी ज्यावेळी फिर्याद द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना बराच काळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवले.
परंतु जेव्हा याघटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त व्हायला लागला , सोशल मीडियावर हि घटना फिरू लागली व पोलिसांना विचारणा होऊ लागली तेव्हा पोलिसच कुलकर्णी यांच्यावर डाफरत म्हणले की, तुम्ही मोठे कार्यकर्ते आहात, हे आम्हाला माहिती नव्हते पण तुम्हीच आधी हे सांगायला पाहिजे होते ना ?
विशेष म्हणजे तोफखाना पोलिसांनी ही घटनेची माहिती पोलिस अधीक्षकांनाही दिलेली नव्हती. पण जेव्हा ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली, दिग्गज लोक विचारणा करू लागले तेव्हा अधीक्षकांनीच पोलिस निरीक्षकांकडे विचारणा केली. त्यानंतर लगेच चक्रे फिरली, सीटीटीव्हीचे पुरावेही हाती लागले… ही सगळी आप बिती हेरंब कुलकर्णी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कथन केला. हे सगळे ऐकून व पोलिसांची भूमिका ऐकून डोक्यावर हात मारून घेतला.
अहमदनगरच्या सीताराम सारडा विद्यालयात सध्या हेरंब कुलकर्णी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी सावेडीतील रासनेनगर भागात रॉडने मारहाण करत त्यांना जखमी करण्यात आले. जेव्हा ही घटना सुप्रिया सुळे यांना समजली त्यांनी आपला अहमदनगर दौरा मधेच थांबवून हेरंब कुलकर्णींच्या घरी धाव घेतली. यावेळी माध्यमांनीही तेथे धाव घेतली. यावेळी बोलताना हेरंब कुलकर्णी यांनी वरील घटना कथन केली.
कुलकर्णी म्हणाले, दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आणि मी पोलिसांत धाव घेतली. मला चार तास पोलिस ठाण्यात बसवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पंचनामा गेल्यानंतरही ते दोन तास थांबवले. पण जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध करणारे वक्तव्य केले, निवेदने दिली तेव्हा तुम्ही वेगळे आणि मोठे आहात, असे आधी सांगायचे ना राव ! अशा शब्दात पोलिसच माझ्यावर डाफरले असे कुलकर्णींनी सांगितले.
अवैध घटनांना विरोध केल्याने माझ्यावर हल्ला
‘मी अकोल्यात शिक्षक असताना बालविवाह थांबवले, दारू पकडवली आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात आवाज उठवला. अकोल्यात माझं मिशन यशस्वी झालं. त्यामुळे मला कोणी हात लावणार नाही, या धुंदीत मी नगरमध्ये मुख्याध्यापक म्हणून आल्यानंतर त्याच जोमाने कामाला लागलो.
येथे आल्यावर शाळेजवळील गुटखा, तंबाखू, मावा विक्री बंद केली आहे. त्यानंतर काही लोक मला मारहाण करायलाही आले होते पण मी काम करत राहिलो. शाळेजवळ उभ्या असलेल्या व अदालथला निर्माण करणाऱ्या वाहनांना दंडही ठोठावला,
त्या रागातून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि पोलीस आता म्हणतात, तुम्ही मोठे व वेगळे आहेत असं सांगायला पाहिजे होते, पण पोलीस सर्वसामान्यांना कसे वागवतात हेही मला पाहायचे होते असे कुलकर्णी म्हणाले.
हेरंब व माझे बहीण-भावाचे नाते : सुप्रिया सुळे
हेरंब आणि माझं भाऊ-बहिणीचं नातं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. कोविड विधवांसाठी त्यांनी प्रेरणादायी काम केलं आहे. हल्लेखोरांवर जो पर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत घटनेचा पाठपुरावा करेल असे सुळे यावेळी म्हणाल्या.
हेरंब कुलकर्णी यांना पोलिस संरक्षण
हेरंब कुलकर्णी याना आता पोलिसांनी संरक्षण दिलंय. त्यांच्या घरी व सोबत पोलीस राहणार आहेत.