बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असतात. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा याची आयडिया कित्येक जणांना येत नाही. कारण व्यवसाय सुरू करताना गुंतवणुकीचा विचार व मिळणारा नफा तसेच हा व्यवसाय चालेल का इत्यादी प्रश्न मनामध्ये येत असतात.
तसेच व्यवसाय सुरू करताना तुम्ही स्वतः गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकतात किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडची फ्रेंचाईजी घेऊन देखील तुम्ही व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. जर आपण फ्रॅंचाईजी व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये आघाडीवर असणाऱ्या अमूल या कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन चांगल्या एरियामध्ये तुमचे आउटलेट उघडून चांगला नफा मिळवू शकतात.
अमुल फ्रॅंचाईझी घेण्यासाठी किती गुंतवणूक लागेल?
सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या उत्पादनाशी संबंधित व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे नशीब आजमावू शकतात. त्यामुळे तुम्ही दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांच्या व्यवसायामध्ये जर उतरायचे असेल तर तुम्ही अमुल या लोकप्रिय ब्रँडची फ्रेंचाइजी घेऊन व्यवसायाला सुरुवात करू शकतात. याकरिता तुम्हाला स्वतः अमूल डेरीशी संपर्क साधने गरजेचे आहे.
अमुल पार्लर हे अशा पद्धतीचे दुकाने आहेत ज्या ठिकाणी अनेक पदार्थांची श्रेणी तुम्हाला मिळते. तुम्हाला जर अमुल पार्लर उघडायचे असेल तर तुम्हाला साधारणपणे दोन ते पाच लाख रुपयांचा खर्च लागतो. तसेच अमुलचे आऊटलेट म्हणजेच दुकान उघडायचे असेल तर कमीत कमी 100 चौरस फूट जागा यासाठी तुम्हाला लागते. तुम्हाला जर अमूल सोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारणपणे व्यक्तीला कंपनीकडे सिक्युरिटी म्हणून पंचवीस हजार रुपये जमा करावे लागतात.
या सगळ्या प्रक्रियेनंतर अमूलचे डीलर्स तुमच्या आउटलेट वर संबंधित ब्रँडचे उत्पादने पुरवतात व या उत्पादनाची विक्री केल्यानंतर त्याचे कमिशन बेस मार्जिन मिळते. तसेच दुसरे म्हणजे तुम्ही अमुल प्रिफर्ड आउटलेट देखील उघडू शकतात. याकरिता तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपये खर्च येतो. तसेच 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा देखील लागते. या दोन लाख रुपयांपैकी तुम्हाला 25 हजार रुपये अमुलला ब्रँड सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतात आणि बाकीचे रक्कम ही नूतनीकरण आणि लागणारी उपकरणे यावर खर्च केले जाते.
अमुल फ्रॅंचाईझी घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्यावी
सध्या जर आपण देशातील दुग्धजन्य पदार्थांच्या किमती पाहिल्या तर त्या खूप वाढल्या असून अशा परिस्थितीमध्ये या व्यवसायात उतरून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात. परंतु या व्यवसायामध्ये येण्याअगोदर तुम्हाला आऊटलेट उघडण्याकरिता एक चांगल्या जागेची आवश्यकता भासते.
ग्राहकांची गरज ओळखून त्याच पद्धतीने दुग्धजन्य पदार्थांची श्रेणी तुमच्या आऊटलेट मध्ये ठेवणे गरजेचे आहे. तसेच दुकान केव्हाही उघडे किंवा केव्हाही बंद न करता त्याच्या परफेक्ट टाइमिंग ठेवणे महत्त्वाचे आहे. या व इतर काही महत्त्वाच्या बाबी जर तुम्ही व्यवस्थित पाहील्या तर या व्यवसायातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता.