Fixed Deposit Interest Rates : 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा बंपर परतावा; वाचा

Sonali Shelar
Published:
Fixed Deposit Interest Rates

Fixed Deposit Interest Rates : जे गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी मुदत ठेव ही एक उत्तम योजना मानली जाते. तसेच हे गुंतवणुकीचे एक उत्कृष्ट साधन देखील मानले जाते. देशातील कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देतात.

जास्तीत जास्त ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी बँका नेहमी नव-नवीन योजना आणत असतात. अशातच सध्या बँकांनी आपले एफडी दर देखील वाढवले आहेत. देशातील सरकारी तसेच खासगी बँकांनी एफडीवर चांगले व्याजदर लागू केले आहेत. दरम्यान, जर तुम्ही देखील गुंतवणूक करून चांगला नफा कमावू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

सध्या देशात अशा अनेक बँका आहेत ज्या FD वर 8% पर्यंत व्याज देत आहेत. ज्यामध्ये DCB बँक देखील आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 36 महिन्यांच्या एफडीवर 8.25 टक्के दराने व्याज देत आहे.

त्याच वेळी, 700 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर आणि 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 8.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. बँक आपल्या FD योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना चांगला परतावा देण्याचे काम करत आहे. DBC बँक जेष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या FD योजनेवर 1 लाख रुपयांच्या
गुंतवणुकीवर 27,760 रुपये इतके व्याज देत आहे.

ज्येष्ठ नागरिक DCB बँकेत 700 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD ठेवीवर वार्षिक 7.60 टक्के व्याज मिळवू शकतात. वरिष्ठांना 700 दिवसांपासून ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 8.25% जास्त व्याज मिळते.

दरम्यान, UCO बँकेने 2 कोटींपेक्षा कमी ठेवींसाठी व्याजदर 135 bps ने वाढवले ​​आहेत. आणि बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुधारित दर डिसेंबरपासून लागू होणार आहेत. बँकेने 444 दिवस आणि 666 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच, किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याजदर देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe