Business Idea: महिलांनो घरी बसून कराल हे व्यवसाय तर कमवाल प्रचंड नफा! वाचा महत्त्वाच्या व्यवसायांची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea:  सध्या महागाईच्या या युगामध्ये प्रचंड प्रमाणात घर खर्च वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पती आणि पत्नी दोघे देखील नोकरी करतात. परंतु यामुळे बऱ्याचदा धावपळ होते व एकमेकांना पुरेसा वेळ न देता आल्यामुळे नात्यात चिडचिडेपणा आणि दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच बऱ्याचदा महिलांना घरी मुलांची जबाबदारी असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही व नोकरी आणि व्यवसाय देखील करता येत नाही.

परंतु बऱ्याच महिलांची अशी इच्छा असते की काहीतरी घरी बसून कुठलातरी व्यवसाय करता आला तर घर खर्चासाठी आपला हातभार लागेल व आपण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ. परंतु बऱ्याचदा अंगभूत गुण आणि कौशल्य असून देखील कुठला व्यवसाय सुरू करावा आहे महिलांना समजत नाही. आपण महिलांसाठी घरी बसून करता येणाऱ्या व्यवसायांची यादी पाहिली तर ती खूप भली मोठी होऊ शकते. त्याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण महिला वर्ग घरी बसून व्यवसाय करून चांगले पैसे मिळू शकतील अशा प्रकारचे काही महत्त्वाचे व्यवसाय बघणार आहोत.

 महिला वर्ग करू शकतील असे महत्त्वाचे व्यवसाय

1- डे केअर सेवा डे केअर सेंटर किंवा यालाच आपण पाळणाघर असे देखील म्हणतो. तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर अशा प्रकारचे पाळणाघरे ही आता काळाची गरज आहे. ज्या महिलांना लहान मुलांचे आवड आहे अशा महिलांकरिता डे केअर सेंटर हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.बऱ्याच नोकरदार महिला या मुलांना घरच्यासारखे चांगले वातावरण मिळावे आणि ममतेने त्यांचे काळजी घेणारे कोणीतरी असावे असे वाटते. त्यामुळे पाळणा घरांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे घरच्या घरी सुरू करता येणारा हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. याकरिता तुम्हाला घरातच थोडी रिकामी आणि मोकळी हवा येणारी जागा निवडणे गरजेचे असून यामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Day-Care Center Project | Pune Municipal Corporation

2- कॉमर्स वस्तू विक्री ई-कॉमर्स हे आधुनिक तंत्रज्ञान असून या माध्यमातून वस्तूंची खरेदी विक्रीसाठी तुम्हाला बाजारपेठेत जायची गरज भासत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी घरबसल्या कुठलीही वस्तू खरेदी करू शकतात किंवा विकू देखील शकतात. या तंत्रज्ञानाचा फायदा ज्यांना घरी बसून व्यवसाय करायचा आहे

त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही घरी बसून एखाद्या वस्तू किंवा पदार्थ बनवत असतील त्यांची विक्री करण्यासाठी तुम्ही ई-कॉमर्सची मदत घेऊन घरबसल्या चांगला पैसा मिळवू शकतो. याकरिता तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. या साइटवर तुम्ही तुमची उत्पादने डिस्प्ले करून लोकांपर्यंत पोहोचवून चांगला व्यवसाय उभारू शकता.

Amazon - The E-Commerce Giant Revolutionizing Online Shopping - Majuli  Island-The Largest River Island In The World

3- कुकरी क्लासेस भारतीय महिलांचा विचार केला तर प्रत्येकाला स्वयंपाक बनवता येतो व महिला वर्ग या स्वयंपाकामध्ये पारंगत असतात. ज्या महिलांना विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याची आवड असते त्यांना ही आवड व्यवसायामध्ये रूपांतरित करता येते. तुमची स्वयंपाकातील किंवा विविध पदार्थ बनवण्याची आवड असेल व त्याचा व्यवसाय मध्ये रूपांतर करायचे असेल तर यासाठी खूप कमी गुंतवणूक करावी लागते.

अशा प्रकारचे पदार्थ तयार करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात छोटे छोटे प्रकारचे कुकिंग क्लास घेऊन करू शकतात. तसेच तुम्ही करत असलेल्या पाककृती दुसऱ्या सोबत शेअर करणे, तुम्ही बनवत असलेल्या पदार्थांचे फोटो इंस्टाग्राम फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर अपलोड करणे यासारख्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची ओळख करून देऊ शकतात. क्लासेस घेता घेताच तुम्ही स्वयंपाक घरातून थेट ग्राहकांच्या डायनिंग टेबल पर्यंत अशा प्रकारच्या सेवा पुरवू शकतात.हा खूप महत्त्वाचा व्यवसाय असून 20 ते 30 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही 30 ते 40% पर्यंत नफा मिळवू शकतात.

29,800+ Cooking Class Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock  | Family cooking, Food, Kitchen

4- मेणबत्ती बनवणे आता विविध सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी गिफ्ट देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अशा गिफ्ट करिता बरेच जण आकर्षक आणि उपयुक्त वस्तू निवडतात. या अनुषंगाने जर तुम्ही विविध रंगाच्या व आकर्षक तसेच डिझाईन असलेले मेणबत्त्या घरबसल्या बनवून त्यांची विक्री सुरू केली तरी तुम्ही खूप चांगला प्रकारे पैसा मिळवू शकता. यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारच्या कल्पना यामध्ये सत्यात आणू शकतात व इंटरनेटवरून देखील नवनवीन कल्पना मिळवून मेणबत्ती तयार करण्यासाठी यांचा वापर करू शकता.

How to Build a Profitable Candle-Making Business | SmallBizClub

5- ज्वेलरी मेकिंग सध्या तरुणांपासून तर लहान मुली आणि महिलांमध्ये फॅशन आणि स्टाईलचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या अनुषंगाने तुम्ही ज्वेलरी मेकिंग हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यासाठी चालू फॅशन ट्रेंडबद्दल माहिती घेणे व दागिन्यांची आवड असणे देखील आवश्यक आहे.

थोडीफार गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामध्ये तुम्ही इमिटेशन ज्वेलरीचे ट्रेनिंग घेतले असेल तर खूप फायद्याचे ठरू शकते. या पद्धतीच्या ट्रेनिंग देणाऱ्या अनेक फॅशन संस्था असून इंटरनेटच्या माध्यमातून देखील तुम्ही याबद्दलची बरीच माहिती मिळवू शकतात. हा व्यवसाय तुम्ही 20000 रुपये गुंतवणूक करून सुरू करू शकतात व या माध्यमातून तुम्हाला पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

What are the Steps to Start an Artificial Jewellery-Making Business?