तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखाल? आयुर्वेदाने सांगितलेली ‘ही’ लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्ही निरोगी आहात!नाहीतर….

Ajay Patil
Published:
symptoms of good health

प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. कारण निरोगी आणि सुदृढ शरीर हे उत्तम जीवनासाठी खूप महत्त्वाचे असून  दैनंदिन कामकाजासाठी देखील शरीर निरोगी असणे खूप गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तर तो बाहेरून एकदम सुदृढ आणि तंदुरुस्त वाटतो.

परंतु शारीरिक दृष्ट्या आतून मात्र तो खूप खचलेला किंवा इतर काही शारीरिक त्रासाचा सामना करत असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की नेमके निरोगी कोणाला म्हणायचे किंवा निरोगी शरीर म्हणजे नेमके काय? तसेच निरोगी शरीराची लक्षणे काय? याचा देखील विचार करणे खूप गरजेचे आहे.

भारतामध्ये पूर्व काळापासून आयुर्वेदाला अनन्यसाधारण असे महत्त्व असून आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक स्थितीचा देखील अभ्यास केला जातो. त्यामुळे जर आयुर्वेदानुसार बघितले तर आयुर्वेदाने निरोगी राहण्यासाठी किंवा निरोगी असल्याची पाच मुख्य लक्षणे सांगितली आहेत. जर ही लक्षणे आपल्यात असतील तर आपण निरोगी आहोत हे आपण समजू शकतो.

 आयुर्वेदाने सांगितलेली निरोगी राहण्याची पाच लक्षणे

1- सुरळीत पचनक्रिया पचन संस्था निरोगी असणे हे निरोगी असण्याचे प्रमुख व मुख्य लक्षण आहे. कारण कोणत्याही व्यक्तीची पचनसंस्था जेव्हा चांगले काम करते तेव्हा खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्वे योग्य पद्धतीने शोषून घेण्यास व टाकाऊ पदार्थांना पूर्ण क्षमतेने बाहेर टाकण्यास व्यक्ती सक्षम असते. निरोगी पचनाच्या लक्षणांमध्ये नेहमी आतड्यांचे हालचाल तसेच चांगली भूक लागणे व पोटात स्वस्थता इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

2- झोप चांगली लागणे पुरेशी आणि चांगली झोप ही शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक असून जेव्हा व्यक्ती व्यवस्थित व नीटपणे झोपते तेव्हा शरीर आणि मन स्वतःला दुरुस्त करण्यास आणि रिनोव्हेट म्हणजे पुनरुज्जीवीत करण्यास सक्षम असते. निरोगी झोपेचे लक्षण म्हणजे सहजपणे झोप येणे तसेच रात्रभर आरामात झोपणे व सकाळी एकदम फ्रेश वाटणे. हे लक्षण देखील निरोगीपणासाठी महत्त्वाचे आहे.

3- दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहणे व्यक्तीमध्ये दिवसभर ऊर्जा पातळी संतुलित असते. म्हणजे अशा व्यक्तींकडे दिवसभराच्या दैनंदिन कामे किंवा क्रियाकालाप करण्यासाठी पुरेशी ऊर्जा आहे आणि दिवस संपला तरी कुठल्याही पद्धतीचा थकवा आणि आळशीपणा वाटत नाही. म्हणजेच निरोगी व्यक्तीमध्ये संपूर्ण दिवसभर ऊर्जेची पातळी संतुलित असते.

4- मन स्थिर स्वच्छ असणे निरोगी शरीरातील मन देखील स्वच्छ, केंद्रित आणि शांत असते. तुम्ही जर विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहात आणि सहजपणे तुमच्यावर तणाव किंवा चिंतेचा प्रभाव पडत नाही किंवा त्यामध्ये तुम्ही गुंतून जात नाही तर हे एक निरोगी मनाचे व निरोगी शरीराचे लक्षण आहे. निरोगी मनाच्या वैशिष्ट्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, चांगले कॉन्सन्ट्रेशन आणि भावनिक स्थिरता यांचा समावेश होतो.

5- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे मजबूत रोगप्रतिकारक शक्ती रोग आणि अनेक संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती निरोगी असते तेव्हा व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते. जरी व्यक्ती आजारी पडले तरी खूप लवकर यामधून बरे होतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीच्या लक्षणांमध्ये वारंवार आजारी न पडणे, आजारी पडला तरी लवकर बरे होणे व सामान्यता निरोगी वाटणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

ही पाचही लक्षणे जर तुमच्यात असतील तर तुम्ही नक्कीच निरोगी आहात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe