दातदुखीला बहुतांशी लोक सामोरे गेलेले आहेत. अनेकांना हा त्रास कमी अधिक जाणवतोच. परंतु अनेक वेळा दातदुखी असह्य होते आणि यामुळे रात्रीची झोप उडून जाते. इतकेच नव्हे तर दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होतो. आपण सुरवातीच्या थोड्या थोड्या वेदनांकडेही दुर्लक्ष करू नये कारण यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला दातदुखीपासून आराम मिळू शकतो.
1. मीठ आणि लवंग
प्रथम काही लवंग बारीक करून घ्या आणि नंतर त्यात मीठ घाला. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी वेदनादायक दातांमध्ये दाबून ठेवा. सकाळी उठल्यावर वेदना दूर होतील.
2. मीठ आणि हळद
एका छोट्या भांड्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट दातांवर चोळा. हळूहळू असह्य वेदना दूर होतील.
3. कडुनिंबाची पाने
कडुनिंबाच्या पानाची पाने बारीक चिरून त्याचा रस काढून घ्यावा. त्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे वेदना देणारे बॅक्टेरिया नष्ट होतील, ज्यामुळे दातदुखी कमी होईल.
4. कांद्याचे तुकडे
स्वयंमापक घरात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा कापून दातांमध्ये दाबल्याने वेदना कमी होतात.
5. लिंबाचा रस
लिंबाचा रस हा दात किडवणाऱ्या जीवाणूंसाठी रामबाण उपाय आहे. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस काढा. आता दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी त्या पाण्याने गुळण्या करा. खूप आराम मिळेल.
(सूचना:कोणतीही आरोग्याची समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)